Sonali Phogat Case: मोठी बातमी! एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा दिले सोनाली फोगट यांना ड्रग्ज; CBI

एका प्लॅस्टिकच्या बाटलीतून जबरदस्तीने त्यांना हे ड्रग्ज देण्यात आले होते. असे सीबीआयने म्हटले आहे
Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry
Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry Dainik Gomantak

Sonali Phogat Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा गोव्यात 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयच्या पथकाने दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा केला आहे. सोनाली फोगट यांना MDMA हे ड्रग्ज एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा देण्यात आले. एका प्लॅस्टिकच्या बाटलीतून जबरदस्तीने त्यांना हे ड्रग्ज देण्यात आले होते. असे सीबीआयने म्हटले आहे.

Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry
Goa: काय सांगता! गोव्यात 40 नव्हे 41 आमदार? काय आहे हा विषय जाणून घ्या

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपत्रानुसार, कर्लीज कल्बमध्ये 22 ऑगस्टच्या रात्री 01:09, 01:10, 01:13, 01:19, 01:22, 01:25 आणि 01:27 असं सात वेळा सुधीर आणि सुखविंदरने सोनाली यांना MDMA ड्रग्ज जबरदस्तीने पाजलं. सीबीआयने कर्लीज क्लबमधील एका वेटरला याप्रकरणाचा साक्षीदार बनवलं आहे. नुकताच या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सुधीर आणि सुखविंदरने सोनालीला सात वेळा ड्रग्ज दिल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, सीबीआयने आपल्या आरोपपत्रात 104 जणांना साक्षीदार बनवलं आहे. पण अद्याप सोनाली फोगटच्या हत्येमागील कारण काय होतं हे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सोनालीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सुधीर आणि सुखविंदरला आरोपी बनवले आहे.

Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry
Pramod Sawant: असुविधा के लिए खेद है! गोव्याचे CM तीन दिवस 'ऑफलाईन'

सोनाली फोगाट हत्या प्रकरणात सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग सध्या अटकेत आहेत. आज सुनावणीसाठी त्यांना म्हापसा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सीसीटिव्ही फुटेज संबधित सादर केलेला अर्ज त्यांनी मागे घेतला आहे. तसेच, म्हापासा न्यायालयाने सोनाली फोगाट प्रकरण स्विकारले असून, पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com