Goa: काय सांगता! गोव्यात 40 नव्हे 41 आमदार? काय आहे हा विषय जाणून घ्या

राज्यातील जंगल राज सरकारचे आणखी एक उदाहरण - सामाजिक कर्यकर्ते
Goa MLA
Goa MLA Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोवा विधानसभेत 40 आमदार आहेत पण, सध्या एक आमदार विधानसभेत निवडून गेलेला नाही तरीही तो आमदार म्हणून समाजात वावरतो. या पठ्याने आपल्या गाडीवर विधानसभेकडून मिळणारे आमदाराचे स्टिकर देखील चिटकले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कर्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज (Adv. Aires Rodrigues) यांनी हे सर्व प्रकरण उघडकीस आणले आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे.

Goa MLA
Vasco: वाहतूक नियम मोडताय? कारवाईला तयार राहा; बेशिस्त बाईक रायडर, कार चालक पोलिसांच्या रडारवर
Aires Rodrigues
Aires RodriguesDainik Gomantak

अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, GA07P7770 या आलिशान कारवरती गोवा विधानसभेचा आमदार असल्याचे स्टिकर चिटकवण्यात आल्याचे आयरिश यांच्या निदर्शनास आले. कार कोणाची आहे याची आयरिश यांनी चौकशी केली RTO कडून गाडी मालकाची माहिती मिळवली. या माहितीमधून ही कार ताळगाव येथील सिद्धेश देसाई यांची असल्याचे उघडकीस आले. या व्यक्तीचे मांद्रेचे आमदार जित अरोलकर यांच्या जवळचे संबंध असल्याचे आयरिश यांनी म्हटले आहे.

Goa MLA
Pramod Sawant: असुविधा के लिए खेद है! गोव्याचे CM तीन दिवस 'ऑफलाईन'

भाजपवर आरोप

आयरिश रॉड्रिग्ज यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केला आहे. राज्यात असलेले भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यासगळ्या प्रकाराला आयरिश 'जंगल राज'चे आणखी एक उदाहरण असल्याचे म्हटले आहे. नियमांचे उल्लघंन करून सुरू असलेल्या याप्रकरणी सभापती रमेश तवडकर यांनी दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, प्रत्येक आमदार आणि त्यांच्या वाहनांची पडताळणी करूनच त्यांना विधानसभा आमदाराचे स्टिकर देण्यात यावे. असेही आयरिश यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com