‘गोवा माईल्स’वरून टॅक्सीचालक आमने-सामने

बार्देशमधील व्यावसायिक पुन्हा आक्रमक
Taxi drivers face to face from Goa Miles
Taxi drivers face to face from Goa MilesDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: राज्यात गोवा माईल्स पर्यटक टॅक्सी सेवा सरकारी मान्यतेनुसार कार्यरत आहे; परंतु स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांकडून या सेवेतील चालकांना दमदाटी तसेच मारहाण होत आहे; परंतु एप्रिलपासून ही सेवा वेगाने कार्यरत होणार असल्याचे गोवा माईल्सचे अधिकारी पराग रायकर यांनी हणजुणेत सांगितले.

Taxi drivers face to face from Goa Miles
आमदार वीरेश बोरकरांचा मंडूर पंचायत सचिवांना दणका

दुसरीकडे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी ‘गोवा माईल्स’ला विरोध दर्शविला आहे. स्थानिक टॅक्सीचालक योगेश गोवेकर म्हणाले, टॅक्सी व्यवसाय हा गोमंतकीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. परप्रांतीय टॅक्सीचालकांना गोवा माईल्सच्या नावाने येथील पर्यटक आणि पर्यटनाशी खेळ मांडू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत राज्यात गोवा माईल्सच्या नावाने स्थानिक टॅक्सीचालकांच्या पारंपरिक व्यवसायाशी परप्रातीयांना खेळू देणार नाही. किनारपट्टी भागातील सर्वच्या सर्व आमदारांना आम्ही गोवा माईल्स मुद्द्यावरून घरी बसवले आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपची फसवी चाल यशस्वी होऊ देणार नाही, असे गोवेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com