वीरेश बोरकर
वीरेश बोरकरDainik Gomantak

आमदार वीरेश बोरकरांचा मंडूर पंचायत सचिवांना दणका

तातडीने बदली: अचानक भेटीमध्ये आढळला गैरहजर
Published on

पणजी: सांत आंद्रेचे नवनिर्वाचित आमदार वीरेश बोरकर हे सध्या चांगलेच कार्यरत झाले आहेत. त्यांनी मतदारसंघात पहिल्यांदाच दिलेल्या अचानक भेटीमध्ये एका अकार्यक्षम पंचायत सचिवाला बदलीला सामोरे जावे लागले.

बोरकर यांनी आजोशी-मंडूर पंचायतीच्या कार्यालयाला अचानक भेट दिली असता, तेथील सचिव 21 दिवसांपासून कोणत्याही माहितीशिवाय गैरहजर असल्याचे आढळले. शिवाय पंचायतीमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला त्यांचा ठावठिकाणा माहीत नव्हता.

वीरेश बोरकर
संजीव नाईक: सामान्य कार्यकर्ता ते उपमहापौर

सचिवांना फोन केल्यावरदेखील ते प्रतिसाद देत ​​नव्हते. त्यानंतर आमदार बोरकर यांनी हे प्रकरण गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडले आणि सचिवांच्या गैरहजेरीमुळे बरीच कामे प्रलंबित राहिल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली. हे सचिव गेल्या 7 वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. मात्र, कामात निष्काळजीपणा करायचे. आमदार बोरकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने आजोशी-मंडूर पंचायतीच्या सचिवांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com