Mulgao: 'गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला खाण व्यवसाय नकोच'! मुळगाववासीय ठाम; रात्रपाळीला विरोध

Mulgao Mining: लीज क्षेत्रापूर्वी गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला आमच्या गावात खनिज व्यवसाय नको, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुळगाववासीयांनी केली.
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: लीज क्षेत्रापूर्वी गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला आमच्या गावात खनिज व्यवसाय नको, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुळगाववासीयांनी केली.

गावचे प्रश्न सुटत नसतील, तर गावात खनिज व्यवसाय नको या भूमिकेवर आजच्या बैठकीत मुळगाववासी ठाम होते. खनिज खाण सुरू झाल्यापासून गेल्या दीड - दोन वर्षांपासून मुळगावात खाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गावातील प्रश्न सोडवा अशी मागणी करीत मुळगावमधील लोक संघटित झाले आहेत. याप्रश्नी स्थानिक तसेच सरकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप सुवर्णमध्य निघालेला नाही.

मुळगाववासीयांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली. उपजिल्हाधिकारी नेहाल तळवणेकर यांच्यासमवेत झालेल्या या बैठकीस मुळगाव पंचायतीसह कोमुनिदाद, देवस्थान, शेतकरी आदी ग्राम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खाण कंपनीचे अधिकारी पोलिस तसेच अग्निशमन आणि अन्य खात्यांचे अधिकारीही उपस्थित होते.

या बैठकीत सरपंच मानसी कवठणकर, कोमुनिदादचे अध्यक्ष माहेश्वर परब, देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, जैवविविधता समितीचे स्वप्नेश शेर्लेकर, माजी सरपंच वसंत गाड आदींनी खाण व्यवसायामुळे निर्माण झालेल्या समस्या उपस्थित करून गावातील प्रमुख समस्या त्वरित सोडवा, अशी मागणी केली.

Goa Mining
Mulgao: "खाणीला आमचा विरोध नाही, पण बफर झोनप्रमाणे खाण सुरू करा" मुळगावासीयांची मागणी

गाळ उपसण्याकडे खाण कंपनीचे दुर्लक्ष

आश्वासन देऊनही गावातील नैसर्गिक तळी आणि शेतीतील गाळ उपसण्याकडे खाण कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे, असा दावा या प्रतिनिधीनी करून शेतकऱ्यांची थकीत नुकसान भरपाई द्या, अशी मागणीही या बैठकीत ग्रामस्थांनी केली.

Goa Mining
Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

रात्रपाळी नको...

खाण लीज क्षेत्रातून घरादारांसह धार्मिक स्थळे आणि शेतीबागायती बाहेर काढा. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार ‘बफर झोन’ निश्चित करा. खाणीवरील रात्रपाळी बंद करा या मुळगाववासीयांच्या प्रमुख मागण्या कायम आहेत. रात्रपाळीवेळी खाणीवरील धडधडमुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सगळ्यांची झोपमोड होत आहे. असा मुळगाववासीयांचा दावा आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत ठोस तोडगा निघाला नसला, तरी ग्रामस्थांच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनासमोर ठेवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com