Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

Goa mining readiness: राज्य खाण तयारी निर्देशांकातील (एसएमआरआय) ‘ब’ गटात गोव्‍याने अव्वलस्‍थान पटकावले आहे. गोव्‍यानंतर या गटात उत्तर प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो.
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खाण मंत्रालयाने जारी केलेल्‍या राज्य खाण तयारी निर्देशांकातील (एसएमआरआय) ‘ब’ गटात गोव्‍याने अव्वलस्‍थान पटकावले आहे. गोव्‍यानंतर या गटात उत्तर प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो.

या निर्देशांकामुळे राज्यांना खाण क्षेत्रात सुधारणा स्वीकारण्यास, गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यास आणि देशाच्‍या खाण उद्योगाच्या एकूण वाढीस हातभार लावण्यास प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्‍यक्त केली आहे.

विविध राज्यांमधील खाण क्षेत्रातील सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खाण व्‍यवसायात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्‍याच्‍या हेतूने केंद्र सरकारने राज्‍य खाण तयारी निर्देशांकाचा उपक्रम राबवला होता.

Goa Mining
Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

राज्‍य खाण तयारी निर्देशांकामध्‍ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन गटांत राज्‍यांची विभागणी करण्‍यात आली होती. ज्‍या राज्‍यांमध्‍ये अधिक खाण साठे आहेत, त्‍या राज्यांचा समावेश ‘अ’ गटात, मध्‍यम साठे असलेल्‍या राज्‍यांचा समावेश ‘ब’ गटात आणि कमी साठे असलेल्‍या राज्‍यांचा समावेश ‘क’ गटात केला होता.

Goa Mining
Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

गटांनुसार अव्वल ठरलेली तीन राज्‍ये

‘अ’ : मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात

‘ब’ : गोवा, उत्तर प्रदेश, आसाम

‘क’ : पंजाब, उत्तराखंड, त्रिपुरा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com