बेतकी बोरीच्या पठारावरून होऊ घातलेल्या इस्कॉन बहुउद्देशीय प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी डेवीड रॉड्रीगीज यांच्या नेतृत्वाखाली 50 पेक्षा जास्त लोकांनी बेतकी बोरीत निदर्शने केली.
आज रविवार 28 रोजी बेतकी बोरीच्या पठारावर इस्कॉन प्रकल्पासाठी रस्ता बांधण्यासाठी तीन जेसीपींद्वारे काम चालु केले होते. तेव्हा या लोकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी निदर्शने केली.
इस्कॉनचा हा प्रकल्प आल्यास जवळपासच्या लोकांना पाणी मिळणार नाही. या भागात अद्याप नळाच्या पाण्याची सोय झालेली नाही. त्याचा परिणाम येथील बागायतीवर होणार असल्याचे डेवीड रॉड्रीगीज यांचे म्हणणे आहे.
ग्रामसभेत या संबंधी ठराव संमत करण्यापुर्वी या प्रकल्पाला कशीकाय मान्यता दिली असे या निदर्शकांचे म्हणणे आहे. या निदर्शकांत रेनबो वॉरीयसचे कार्यकर्ते झेवीअर फर्नांडीस, राहुल नाईक सुदेश बोरकर, सचिन नाईक, लिंडन रॉड्रीगीज, कायतान परेश डायना तावारीस आदी उपस्थित होते.
यावेळी स्थानिक पंचसदस्या सागर नाईक बोरकर यांना बोलावून घेतले गेले. या संबंधई सागर नाईक बोरकर म्हणाले की, त्यावेळेच्या पंचायत मंडळाने 2017 साली या प्रकल्पाला मान्यता दिलेली असून यापूर्वीच सर्व सोपस्कर पुर्ण करून संबंधीतानी या प्रकल्पाच्या कामाला सुरवात केलेली आहे.
तुम्हाला या संबंधी अधिक माहिती हवी असल्या उद्या सोमवार 29 रोजी पंचायत कार्यालयात येऊन सरपंचाकडून मिळवावी असे पंचसदस्य सागर नाईक बोरकर यांनी निदर्शने करणाऱ्यांना सांगितल्याचे गोमन्तकशी बोलताना सांगितले. निदर्शने करणाऱ्यांत काही स्थानिक व जवळपासच्या भागातील नागरिक सहभागी झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.