गोव्यात एकाच व्यक्तीचा काणकोण, मडगाव अशा 2 ठिकाणी एकाचवेळी जन्म; काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर...

सरकार दप्तरी नोंद, उच्च न्यायालयानेही दिले आहेत आदेश
Goa Birth Records:
Goa Birth Records:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Birth Records: गोव्यात एकाच व्यक्तीने चक्क दोन ठिकाणी जन्म घेतला आहे. या व्यक्तीने एकाचवेळी काणकोण आणि मडगाव येथे जन्म घेतल्याची नोंद सरकार दप्तरी नोंद आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून न्यायालयानेही या प्रकरणी आदेश दिले आहेत.

या प्रकरणी कोर्टाने याचिकाकर्त्याला प्रतिज्ञापत्र आणि इतर दस्तऐवज दोन आठवड्यात मुख्याधिकारी/निबंधकासमोर दाखल करण्याचे निर्देश दिले सादर करण्यास सांगितले आहेत. आणि या प्रकरणी एक महिन्यात निकाल देण्यासही सांगितले आहे.

1982 मधील ही घटना आहे. या प्रकरणी मडगाव नगरपरिषदेने दुसरा जन्म नोंदणी दाखला रद्द करण्यास नकार दिला होता. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द करण्याचा आदेश दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Birth Records:
Mopa Airport: अंगावरच्या कपड्यात लपवले 66 लाख रूपयांचे सोने; मोपा विमानतळावरून तस्करीचा प्रयत्न उघड

या व्यक्तीचा जन्म त्याच्या आईच्या घरी काणकोण येथे झाला होता. त्यानंतर त्याच्या आजोबांनी त्याच्या जन्माची माहिती पंचायतीला दिली आणि 1982 मध्ये काणकोण येथे ही नोंद करण्यात आली.

त्याच्या जन्मातील काही गुंतागुंतीमुळे त्याच्या आईला त्याच्यासोबत मडगाव येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोन महिन्यांनंतर त्याच्या जन्माची नोंदणी करण्यासाठी MMC कडे हॉस्पिटलने दुसरा फॉर्म 2 सादर केला.

अशा प्रकारे, त्याच्या जन्म नोंदणीच्या दोन नोंदी आहेत. ज्या दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याने हायकोर्टात अर्ज सादर केला होता. जन्माची दुसरी नोंद हटवण्यासाठी MMC कडे अर्ज दाखल केला होता. पण मडगाव पालिकेने त्यास नकार दिला होता.

Goa Birth Records:
Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर

संबंधित व्यक्तीचे वकील धर्मानंद वेर्णेकर यांनी आरोप केला आहे की, जन्म आणि मृत्यू निबंधक एमएमसीने अर्जातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी कोणतीही चौकशी केली नाही किंवा प्राधिकरणासमोर काहीही सामग्री ठेवण्याची संधी दिली नाही.

याचिकाकर्त्याने म्हटले आहे की तो त्याच्या आई आणि वडिलांच्या किंवा त्याच्या जन्माच्या घटनेच्या इतर कोणत्याही साक्षीदारांच्या प्रतिज्ञापत्रांवर नोंदवण्यास तयार आहेस जेणेकरून रजिस्ट्रार/मुख्य अधिकारी ऑर्डर पास करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com