Lost From Beach: मुलांना फिरायला कुठेतरी घेऊन जायचे असेल तर बीच हा एक चांगला पर्याय असू शकतो. मुलांना समुद्रकिनारी खूप मजा येते. मुलांना वाळूमध्ये छोटी-छोटी घरे बांधणे किंवा पाण्यात खेळणे आवडते. लहान मुलांसोबत समुद्रकिनाऱ्यावर मजा करणे मजेदार असले तरी ते थोडे चिंताजनक देखील आहे.
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावरुन लहान मुले हरवतातही. गोव्यात अशा घटना अनेकदा समोर येतात. परंतु ही बातमी वाचून तुम्ही खरंच खूश व्हाल. होय, गोव्यात पाच मुलांचे त्यांच्या कुटुंबियांसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात आले, ज्यामुळे 2024 च्या पहिल्या साडेचार महिन्यांत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर त्यांच्या कुटुंबांसोबत पुनर्मिलन झालेल्या मुलांची एकूण संख्या 51 वर पोहोचली.
दरम्यान, दृष्टी मरीन लाइफसेव्हर्सने बेळगावमधील एका सहा वर्षाच्या मुलाला त्याच्या पालकांची दक्षिण गोव्यातील वार्का बीचवर भेट घडवून आणली. ओळखीची पुष्टी झाल्यानंतर मुलाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले, जे त्याचा शोध घेत होते.
बागा बीचवरही वेगवेगळ्या घटनांमध्ये हरवलेल्या तीन मुलांना ओळखीच्या पुष्टीनंतर आठवड्याच्या शेवटी त्यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आले. हैदराबादमधील एक सात वर्षांचा मुलगा, कर्नाटकातील (Karnataka) चार वर्षांची मुलगी आणि गोव्यातील एका 10 वर्षाच्या मुलाला लाइफसेव्हर्सने त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील (Mumbai) सात वर्षांचा मुलगाही त्याच्या आई-वडिलांसोबत परतला. दृष्टी मरीन लाइफसेव्हर्सने हे पुनर्मिलन घडवून आणले. आठवड्याच्या शेवटी दोन प्रौढ व्यक्तींना प्राथमिक उपचार देण्यात आले. चंदीगड येथील एका 26 वर्षीय तरुणीला पाण्यात पडल्यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने तिला ऑक्सिजन देण्यात आला. कांदोळीतील प्राथमिक उपचार केंद्रात तिला दाखल करण्यात आले होते. तर पोहताना अंगठ्याला दुखापत झालेल्या 26 वर्षीय तरुणावर प्रथम उपचार केल्यानंतर त्याला मित्राच्या स्वाधिन केले.
दुसरीकडे, बागा बीचवर दोन मित्रांना वाचवण्यात आले. जिथे बंगळुरुमधील 20 आणि 22 वर्षांचे दोन मित्र रिप करंटमध्ये अडकले होते. त्यांना लाइफसेव्हर्स सिद्धेश, विशाल आणि संदीप यांनी रेस्क्यू बोर्ड आणि ट्यूबच्या मदतीने वाचवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.