

सांगे: सांगे महालाचे आराद्य दैवत श्री पाईक देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी पहाटे साडे पाच वाजता देवस्थान समितीच्या वतीने महाराजांना तेलस्नान घालून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी दहापर्यंत शेकडो भाविकांनी तेलस्नान घालून नवस केला तर कित्येकांनी नवस फेडला. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रेमानंद गावकर यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
संध्याकाळी स्थानिक कलाकारांनी भजन केले. त्यानंतर सनई वादनाच्या घोषात श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. रात्री श्री पाईकदेव रयत समाज सांगेकडून दुरिग हा कोकणी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या उत्सवात एकूण चार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. रविवारी महापालखी उत्सव होईल. सोमवार ९ फेब्रुवारी रोजी महारुद्र (हवन) झाल्यानंतर जत्रेचा समारोप होणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद वितरण सुरुवात झाली. संध्याकाळी पाचपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सांगे व अन्य भागातील किमान पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीय भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. सरकारी कर्मचारी, अधिकारी, राजकीय पुढारी, सांगेत काम करून गेलेले सरकारी अधिकारी आवर्जून जत्रेला उपस्थित राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.