Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

Shri Shantadurga Jatra Kavale: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून भक्तांच्या जीवनातील शांती, समन्वय आणि करुणेची अधिष्ठात्री शक्ती आहे.
Shri Shantadurga Jatra
Shri Shantadurga JatraDainik Gomatnak
Published on
Updated on

गोमंतकाच्या पुण्यभूमीत, अंत्रूज महालाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र कैवल्यपूर (कवळे) हे जणू श्रद्धेचे तीर्थक्षेत्र आहे. येथील श्री शांतादुर्गा देवीचे भव्य देवालय हे गोमंतकातील वैभवशाली मंदिरांपैकी एक मानले जाते.

येथे विराजमान असलेली श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून भक्तांच्या जीवनातील शांती, समन्वय आणि करुणेची अधिष्ठात्री शक्ती आहे. या पवित्र क्षेत्रात दरवर्षी साजरा होणारा श्री शांतादुर्गा जत्रोत्सव हा भक्तीचा, परंपरेचा आणि आत्मिक आनंदाचा महासोहळा ठरतो.

माघ शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल षष्ठीपर्यंत चालणाऱ्या या जत्रोत्सवात देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक कवळे येथे येतात. विशेषतः माघ शुद्ध पंचमीचा दिवस भक्तांसाठी महापर्वणीसमान असतो.

दरवर्षी माघ महिन्यात साजरा होणारा श्री शांतादुर्गा जत्रोत्सव म्हणजे भक्तीचा महासागर उसळून येण्याचा क्षण असतो. माघ शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल षष्ठीपर्यंत संपूर्ण कवळे गाव भक्तीच्या सुगंधाने दरवळतो. दूरदूरहून आलेले भाविक, हातात नारळ, ओठांवर प्रार्थना आणि डोळ्यांत आशा घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक होतात.

Shri Shantadurga Jatra
Damodar Temple Fatorda: लोकांच्या हाकेला पावणारा देव! श्री दामोदर देवस्थान (लिंग), फातोर्डा वार्षिकोत्सव

जत्रोत्सवाचा हृदयस्पर्शी क्षण म्हणजे माघ शुक्ल षष्ठीच्या म्हणजे महापर्वणीच्या दिवशी निघणारी महारथातून श्री शांतादुर्गा मातेची भव्य मिरवणूक. चौघड्याचा निनाद आसमंत दुमदुमतो, दीपांच्या रांगांमध्ये अंधार हरवून जातो, आणि रथावर विराजमान असलेल्या शांतादुर्गा आईच्या दर्शनाने मन तृप्त होते. त्या क्षणी अनेकांचे डोळे सुखावतात कारण ती माता केवळ मूर्ती नसते, ती प्रत्येकाच्या सुख-दुःखाची साक्षीदार असते.

Shri Shantadurga Jatra
Konkan Temple: श्रद्धेने हाक मारल्यावर तलावाच्या पाण्यातून येतात बुडबुडे, पहा कोकणातले 'हे' अद्भुत मंदिर

ही जत्रा केवळ धार्मिक विधी नाही, तर भक्त आणि देवी यांच्यातील अतूट बंधाची. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली ही परंपरा, एकतेची भावना आणि भक्तीचा अखंड प्रवाह आजही तितक्याच निष्ठेने जपली जाते, कारण श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे. शांतादुर्गेची कृपा सर्वांवर अखंड अशीच बरसत राहो, हेच प्रत्येक भक्ताच्या हृदयातून उमटणारे साकडे आहे.

- पी. नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com