Assembly Elections: फोंड्यात राजकीय हालचाली सुरू; भाजप, काँग्रेसच्‍या उमेदवारीवर नजर

विधानसभा निवडणूक; आतापासूनच गुडघ्‍याला बाशिंग!
Assembly Elections
Assembly ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

Assembly Elections ‘जो थांबला तो संपला’ ही उक्ती राजकारणाला तंतोतंत लागू होते. त्‍यामुळेच विधानसभा निवडणुका अजून पावणेचार वर्षे दूर असूनही त्‍यावर नजर ठेवून फोंडा मतदारसंघात आतापासूनच राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक असली तरी काही इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे.

फोंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक हे पुढील विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार नाहीत असे गृहीत धरून या मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. जो तो आपले स्वतःचे राजकीय ‘वजन’ वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.

भाजपचे फोंडा गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी हे आपल्या परीने सक्रिय झाले असून त्यांचे कार्यकर्ते पुढील निवडणुकीत दळवी हेच फोंड्यातील भाजपचे उमेदवार असतील असे छातीठोकपणे सांगताना दिसताहेत.

नुकत्याच पार पडलेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सातमधून बिनविरोध निवडून आल्यामुळे दळवींचे वजन वाढले आहे. त्याचबरोबर त्यांना एका बाजूला फेकण्‍याचा प्रयत्न भाजपच्याच एका गटाकडून केला जात असल्याचेही दिसतेय.

Assembly Elections
Gomantak Editorial: भविष्यवेधी दातृत्व

दुसऱ्या बाजूला मगॊचे गेल्या निवडणुकीतील उमेदवार डॉ. केतन भाटीकर हे त्‍या पक्षाच्या छायेतून दूर होऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या फोंडा पालिका निवडणुकीत त्यांच्या पॅनलला बऱ्यापैकी यश मिळाल्यामुळे त्यांचा उत्‍साह वाढला आहे.

म्हणूनच गेल्यावेळी 77 मतांनी हुकलेली गाडी ते यावेळी पकडणारच असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रवींचे पुत्र रॉय हेही पुढील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. फोंड्याचे नगरसेवक असल्यामुळे त्यांना राजकीय अस्तित्व प्राप्त झाले आहे.

केतन भाटीकर यांची स्‍वतंत्र मोहीम

मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी सध्‍या स्वतंत्ररित्या मोहीम आखली आहे. अनेक आरोग्य शिबिरे व विविध उपक्रम ते राबवत आहेत. त्‍यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्‍यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत मगॊचे सर्वेसर्वा तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे सहकार्य न लाभताही एकहाती यश मिळविल्यामुळे ते सध्या स्वतंत्ररित्या कार्य करताना दिसत आहेत.

आगामी निवडणूक ते कोणत्या पक्षातर्फे लढवणार हे स्पष्ट झाले नसले तरी सध्या ते स्वतंत्ररित्या आपले ‘वजन’ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Assembly Elections
Educational Policy: शिक्षणातील प्राधान्यक्रम आणि आर्थिक गणित

राजेश वेरेकरांचे ‘वेट अॅण्‍ड वॉच’

गेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हे सध्या ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये असल्यासारखे दिसत आहेत. वाढदिनी रुग्णवाहिका लोकार्पण केल्यानंतर त्यांच्या आघाडीवर सामसूम दिसून येतेय. योग्यवेळी ते आपली रणनीती उघड करतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

‘झारीतील शुक्राचार्य’ पुन्‍हा देणार भाजपला दणका!

फोंड्याचे नगराध्यक्ष तथा रवी पुत्र रितेश नाईक यांना भाजपचे उमेदवार बनण्याची सर्वाधिक संधी असली तरी त्यांच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांची संख्याही कमी असणार नाही.

गेल्या खेपेला फोंड्यातील भाजपच्याच काही ‘झारीतील शुक्राचार्यांनी’ पडद्यामागून भाजपचे उमेदवार रवी नाईक यांच्याविरोधात राजकारण केल्यामुळे रवींना निसटता विजय मिळाला होता.

यामुळेच एरव्ही साडेनऊ हजारांच्या आसपास मते मिळविणारे रवी गेल्यावेळी फक्त साडेसात हजार मते प्राप्त करू शकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com