Vasco News
Vasco NewsDainik Gomantak

International Yoga Day in Vasco: एमपीए प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या परिसरात ‘योग सागरमाला’ या संकल्‍पनेसह योग दिवस साजरा

एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोद कुमार म्हणाले की, योग हा केवळ व्यायाम नसावा तर तो आपल्या जीवनाचा आणि कृतीचा एक भाग बनला पाहिजे.
Published on

International Yoga Day in Vasco: एमपीएच्या बर्थवर ‘सागर कन्या’ या संशोधन जहाजावरील सर्व क्रू मेंबर्ससाठी आज योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बी. जी. देसाई, योगतज्‍ज्ञ आणि बंदर कर्मचाऱ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवस एमपीए प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या परिसरात ‘योग सागरमाला’ या संकल्‍पनेसह साजरा करण्यात आला.

योगगुरु फराहद जहाँ यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून सहभागींना मार्गदर्शन केले. एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोद कुमार म्हणाले की, योग हा केवळ व्यायाम नसावा तर तो आपल्या जीवनाचा आणि कृतीचा एक भाग बनला पाहिजे.

यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व एचओडी, बंदर अधिकारी, सीआयएसएफ कर्मचारी, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Vasco News
Assembly Elections: फोंड्यात राजकीय हालचाली सुरू; भाजप, काँग्रेसच्‍या उमेदवारीवर नजर

दरम्यान, मुरगाव बंदर दीपविहार शाळेतही योगाचा कार्यक्रम घेण्यात आला. योग प्रभा भारती ट्रस्टचे विश्वस्त सुरेश पटेल यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीआयएसएफ युनिट एमपीए येथेही योग सत्र घेण्‍यात आले, ज्यामध्ये अधिकारी वर्ग आणि एकूण 44 कर्मचारी सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com