Goa Crime: मद्यप्राशन करुन चाकूने केले वार, बायणा येथे 64 वर्षीय महिलेची हत्या; आरोपी अटकेत

Baina Crime News: बायणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नायक इमारतीमध्ये एका 64 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Baina Crime News
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Baina Crime News: बायणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नायक इमारतीमध्ये एका 64 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी, 21 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 64 वर्षीय महिरुन्निसा यांचा मृतदेह त्यांच्याच तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने, म्हणजेच चाकूने अनेक वार करुन त्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. महिरुन्निसा या एकट्याच राहत होत्या.

Baina Crime News
Goa Crime: मोबाईल फोडला, कामाच्या ठिकाणी जाऊन केला चाकूहल्ला; कळंगुट येथे परप्रांतीय तरुणांत वाद, पोलिसांत तक्रार दाखल

आरोपीला अटक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीला (Accused) अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे. हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली आहे की, यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे बायणा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ज्येष्ठ महिलेची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Baina Crime News
Goa Crime: कायदा व पोलिसांचा धाक उरला नाही का? ‘हिस्ट्रिशिटर्स’ची गुन्हेगारी वाढली; राज्यात यावर्षी सुमारे 11 गंभीर घटना

दरम्यान, या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizens) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच या हत्येमागचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com