Goa Crime: मोबाईल फोडला, कामाच्या ठिकाणी जाऊन केला चाकूहल्ला; कळंगुट येथे परप्रांतीय तरुणांत वाद, पोलिसांत तक्रार दाखल

Calangute Crime: कळंगुट येथे परप्रांतीय नुरा नामक तरुणावर शिवा नावाच्या तेलंगणातील तरुणाकडून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: कळंगुट येथे परप्रांतीय नुरा नामक तरुणावर शिवा नावाच्या तेलंगणातील तरुणाकडून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात कळंगुट पोलिसांनी रितसर तक्रार दाखल करून घेतली असून पोलिस पथक शिवाच्या शोधात आहेत.

दरम्यान, नुराच्या प्रेयसीशी लगट करण्याचा शिवा तेलंगणा सातत्याने प्रयत्न करत होता, याआधीही शिवा तेलंगणा कडून आपल्याला मारहाण झाल्याची माहिती धुरा यांनी दिली. तसेच आपल्या लहान भावालाही कांदोळीतील टेकडीवर शिवा घेऊन गेला होता.

Goa Crime News
Goa Crime: 24 तासांत चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, आसाममधील आरोपी जेरबंद, 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

परंतु त्याने प्रसंगावधान राखीत तेथून धूम ठोकल्याने तो बचावला असे धुरा यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी आपल्या अनुपस्थित शिवा आपल्या राहत्या खोलीवर गेला व त्याने आपण वापरत असलेला मोबाईल फोन फोडून टाकला व संध्याकाळी आपण काम करत असलेल्या ठिकाणी येत आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. कळंगुट पोलिस या प्रकरणी पुढिल तपास करीत आहेत.

Goa Crime News
Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

वास्कोत तिघांना अटक

रात्री उशिरा केलेल्या कारवाईत वास्को पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळ तिघांना अटक केली. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळला, ज्याची किंमत खुल्या बाजारात ५.३४ लाखांपेक्षा जास्त आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ऑफिसजवळ १७ रोजी रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी वाडे येथील सपनोश्वर गौडा उर्फ गंगू आणि निलांचल गौडा (मुळ ओडिसा) तसेच त्यांना मदत करणारा निलांचल याला ताब्यात घेण्यात आले. चौहान आणि स्वप्नेश्वर यांच्याकडे ५.३४ लाख रुपयांच्या ५.३४ किलो गांजा आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com