Porvorim News: धक्कादायक! गोव्यात झळकला 'गोवन्स आर नॉट वेलकम' असा बोर्ड...

खोडसाळपणाबद्दल दुकानाच्या मालकाकडून पोलिसांत तक्रार दाखल
Porvorim News
Porvorim NewsDainik Gomantak

Porvorim News: स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात ब्रिटिशांचा अंमल होता आणि तेव्हा बड्या हॉटेल्समध्ये किंवा अनेक ठिकाणी 'इंडियन्स आर नॉट अलाऊड' असे बोर्ड लिहिलेले असायचे. भारतीयांना कमी लेखून त्यांना तशी वागणूक ब्रिटिशांकडून दिली जात होती.

हा काळ आता गेला आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटली आहेत. तथापि, भेदभावाची किंवा दुसऱ्यांना कमी लेखण्याची ही प्रवृत्ती अधूनमधून डोके वर काढत असते. आताही असाच एक प्रकार गोव्यात उघडकीस आला आहे.

Porvorim News
Mauvin Godinho: गोव्यात विमानतळावर बहुमजली पार्किंग, एअरपोर्ट ते वेर्णा फ्लायओव्हर आणि मॉडर्न बसस्थानके...

गोव्यातील पर्वरी येथे एका प्रमुख चौकातील दुकानावर चक्क 'गोवन्स आर नॉट वेलकम' असा बोर्ड झळकला आहे. भर चौकात असा बोर्ड झळकलेला पाहून अनेक गोवेकरांचा संताप अनावर झालेला आहे. पर्वरीच्या सुपरमार्केट परिसरात हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एलईडी स्ट्रीप असलेला साईन बोर्ड आहे.

यात अक्षरे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाताना दिसतात. या स्क्रोल्ड मेसेजमध्ये 'गोवन्स आर नॉट वेलकम' अशी अक्षरे पडत होती. अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तर काही संतप्त लोकांनी याबाबत थेट दुकानदाराकडे तक्रार केली.

Porvorim News
Mapusa Traffic Police: म्हापश्यात वाहतूक नियमांबाबत जागृतीसाठी पोलिस उतरले रस्त्यावर...

काही जणांनी दुकानदाराला याबाबत जाब विचारताच त्याने यात त्याची किंवा दुकान व्यवस्थापनाची काहीही चूक नाही, असे सांगितले. तसेच हा बोर्ड हॅक करण्यात आला असल्याची माहिती दिली.

दरम्यान, संबंधित दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीतही हा बोर्ड हॅक करण्यात आल्याचे म्हटले आहे.

या प्रकाराबाबत अद्याप इतर काहीही माहिती समोर आलेली नाही. खरंच हा बोर्ड कुणी हॅक केला आहे किंवा हा खोडसाळपणा कुणी केला आहे, याची अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com