Mapusa Traffic Police: म्हापश्यात वाहतूक नियमांबाबत जागृतीसाठी पोलिस उतरले रस्त्यावर...

नियमभंग प्रकरणी 100 जणांना चलन नोटीस
Mapusa Traffic Police
Mapusa Traffic PoliceDainik Gomantak

Mapusa Traffic Police: गोव्यात सध्या अपघातांतील बळी हा गंभीर आणि चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळेच वाहतूक खात्याकडूनही विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी म्हापसा येथे पोलिसांनी रस्त्यावर उतरून जनजागृती केली.

Mapusa Traffic Police
Mauvin Godinho: गोव्यात विमानतळावर बहुमजली पार्किंग, एअरपोर्ट ते वेर्णा फ्लायओव्हर आणि मॉडर्न बसस्थानके...

वाहतूक नियमांविषयी जागृती करण्यासाठी म्हापश्यात पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर हे आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक नियमांबाबत जागृतीही केली. तसेच या मोहिमेवेळी 100 जणांना नियम उल्लंघन प्रकरणी दंड करण्यात आला.

म्हापशात राबविण्यात आलेल्या खास तपासणी मोहीमेत वाहतूक पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर देखील सहभागी झाले. शिवाय यामध्ये पिंक फोर्स देखील या मोहिमेत सहभागी झाला.

राज्यात गेल्या 52 दिवसांत विविध भागांत घडलेल्या अपघातांत एकूण ४९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पैकी 1 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या काळात अपघातात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही जण गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर इस्पितळांत उपचार सुरू आहेत.

Mapusa Traffic Police
Japanese Tourist Fraud Case: जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना 50 हजाराचे बक्षिस

गेल्या काही दिवसांत या मुद्यावरून सर्वत्र चर्चा झडत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अपघातांना बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर सर्व जबाबदारी सरकार वाहनधारकांवर ढकलत असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती.

काही ठिकाणे ही अपघाताची केंद्रे झाली आहेत. या ब्लॅक स्पॉटकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावरील खड्डे, ओबडधोबड रस्ते हेच अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे विरोधी नेत्यांनी म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com