Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Shivraj Singh Chouhan Goa Visit: २०१४ नंतर गोव्यात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘आश्‍चर्य’ असे संबोधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोव्याच्या प्रगतीचे कौतुक केले.
Shivraj Singh Chouhan Goa Visit
Goa DevelopmentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: २०१४ नंतर गोव्यात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘आश्‍चर्य’ असे संबोधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोव्याच्या प्रगतीचे कौतुक केले. झुआरी पूल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले.

गोवा दौऱ्यावर असलेल्या चौहान यांनी कुठ्ठाळी येथील झुआरी पुलाला भेट देऊन पाहणी केली. पुलाची भव्य रचना आणि एकंदर सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. २०१४ पूर्वीही आपण गोव्यात आलो होतो. त्यावेळी मडगावहून पणजीला जाण्यासाठी सुमारे दीड तास लागत होता. आता गोव्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, राज्य ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहून आनंद वाटतो, असे चौहान यांनी सांगितले.

Shivraj Singh Chouhan Goa Visit
Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

गोव्याच्या विकासाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांना दिले. मुख्यमंत्री सावंत विकासाच्या माध्यमातून गोव्याला पुढे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

म्हणून प्रवास अधिक सुलभ

झुआरी पुलाच्या उभारणीत योगदान देणारे राज्य सरकार, अभियंते व संबंधित यंत्रणांचेही चौहान यांनी विशेष कौतुक केले. राज्यातील पायाभूत सुविधांमधील बदलामुळे प्रवास अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी नमूद केले. या सुविधांमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.

Shivraj Singh Chouhan Goa Visit
Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com