

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी ही जत्रा साजरी होणार आहे.
जत्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज शनिवारी शिरगाव येथे प्रशासन आणि देवस्थान समितीची संयुक्त बैठक पार पडली. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत व उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लईराई संस्थान सभागृहात ही बैठक झाली.
बैठकीनंतर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत धोंड तळी, होमकुंड आदी महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. सुरक्षाविषयक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या.
डिचोली (प्रतिनिधी) : मुळगाव-डिचोली येथील श्री केळबाई देवीची प्रसिद्ध ‘पेठेची जत्रा’ सोमवारी (ता. २३) साजरी करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (ता.२७) कौलोत्सव होऊन या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळपासून देवीच्या मंदिरात विविध पारंपरीक विधी होणार आहेत. दुपारी पवित्र तळीवर शुचीर्भूत होऊन व्रतस्थ धोंड भक्तगणांतर्फे देवीचा जयघोष करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.