Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

prostitution in Goa bars: राज्‍यातील अनेक आस्‍थापनांना रेस्‍टॉरन्‍ट आणि बारचेच परवाने असताना त्‍यात बेकायदेशीररित्‍या डान्‍स बार सुरू आहेत.
Goa Illegal Dance Bars
Goa Illegal Dance BarsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील अनेक आस्‍थापनांना रेस्‍टॉरन्‍ट आणि बारचेच परवाने असताना त्‍यात बेकायदेशीररित्‍या डान्‍स बार सुरू आहेत. त्‍यातून वेश्‍‍या व्‍यवसायालाही प्रोत्‍साहन मिळत असल्‍याचे वारंवार स्‍पष्‍ट होत असल्‍याने गोव्‍याची बँकाँकच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाल्‍याचे चित्र दिसत आहे, असे मत ‘अर्ज’ संघटनेचे संस्‍थापक अरुण पांडे यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना स्‍पष्‍ट केले.

हडफडे येथील रोमियो लेन क्‍लबमध्‍ये विदेशी नृत्‍यांगना नृत्‍य करीत असतानाच आग लागली. त्‍यात २५ जणांचा मृत्‍यू झाला. यासंदर्भात पांडे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारी निष्क्रियतेवर बोट ठेवले.

Goa Illegal Dance Bars
Goa Politics: 'आरजी'शी युतीस विरियातोंचा हाेता विरोध, तीन आमदारांचा आग्रह; परब यांच्‍या पवित्र्याबद्दल होता संशय

तर राज्यातील पर्यटन कोलमडेल

क्‍लब, बारमध्‍ये नृत्‍यांगनांना नाचवणे ही मुळात गोव्‍याची किंवा भारताची संस्‍कृती नाही. तरीही गोव्‍यात असे प्रकार घडत असल्‍याने गोव्‍याचा बँकॉक झाल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा प्रकारांमुळे गोव्‍याच्‍या निसर्गाचा कुटुंबांसमवेत आस्‍वाद घेण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांत घट होत आहे.

केवळ तरुण मुले-मुलीच असे प्रकार पाहण्‍यासाठी गोव्‍याकडे आकर्षित होत आहेत. त्‍याचा मोठा फटका गोव्‍याच्‍या पर्यटनाला बसत आहे. राज्‍यात असे प्रकार सुरूच राहिल्‍यास पर्यटन आणखी कोलमडण्‍याची शक्‍यता पांडे यांनी व्यक्त केली.

Goa Illegal Dance Bars
Goa News: मालिन जेटीजवळ भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 50-55 वर्षांच्या व्यक्तीला बसने चिरडले, मृत्यू

अधिकारी, पंचायतींवर नियंत्रण हवे

राज्‍यात अजूनही प्रशासनातील अधिकारी आणि पंचायतींच्‍या आशीर्वादाने अशा पद्धतीने बेकायदेशीररित्‍या डान्‍स बार चालवले जात आहेत. त्‍यावर पूर्णत: नियंत्रण ठेवण्‍याची मागणी ‘अर्ज’ संघटना गेल्‍या अनेक वर्षांपासून सरकारकडे करीत आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने पुढील काळात अशा क्‍लबना परवाने देणारे अधिकारी आणि स्‍थानिक पंचायतींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही पांडे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com