Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Goa Rain Update: अरबी समुद्रात स्थिरावलेला कमी दाबाचा पट्टा आणि ‘मोंथा’ च्या प्रभावामुळे राज्याला ऐन ऑक्टोबरात पावसाने झोडपून काढले.
Published on

पणजी : अरबी समुद्रात स्थिरावलेला कमी दाबाचा पट्टा आणि ‘मोंथा’ च्या प्रभावामुळे राज्याला ऐन ऑक्टोबरात पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी रस्ते तुंबले, घरांची पडझड झाली तर भातपीकासह इतर हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा पुरवठा खंडित होणे, वाहतुकीत अडथळे आणि जलमय परिसर या साऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टबरमधील आतापर्यंत ११.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता काही प्रमाणात मंदावली होती परंतु आज पहाटेपासूनच राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. गुरूवारीही ‘यलो अलर्ट’ कायम आहे.

आज सकाळपासून ले भात देखील झडून गेले. हाता-तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हेरावरून घेतला शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पणजी येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत ५६.४ मिमी म्हणजेच २.१४ इंच तर मोपा विमानतळ परिसरात २४.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Goa Rain Update
Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

शाळेला सुट्टी असल्याने वाचला जीव

बोडणवाडा सालेली सत्तरी येथील राजाराम गावकर या घराचे छप्पर मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे कोसळले. गावकर कुटुंबिय ज्या खोलील रात्री झोपायचे त्याच खोलीचे छप्पर कोसळले.

सुदैवाने, शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने राजाराम गावकर यांनी आपल्या पत्नीसह मुलांना मामाच्या गावी पाठविले होते आणि राजाराम कामाला गेला होता त्यामुळे अनर्थ टळला. गावकर कुटुंबियाचे दैव बलवत्तर म्हणून अपघात टळल्याचे बोलले जाते.

दिवसभरातील प्रमुख घटना

१) केसरकरवाडा, मोर्ले सत्तरी येथे पावसाचे पाणी मीटरमध्ये गेल्याने शॉटसर्कीट होऊन शशिकांत केसरकर यांच्या घराचे नुकसान झाले.

२) डिचोलीत पावसाचा आठवडी बाजाराला फटका. लोकांचे हाल

३) पणजीत पावसामुळे रस्ते पाण्याखाली. अटल सेतूवर साचले पाणी, अपघातामुळे वाहतूकीस अडथळा.

४) सांताक्रुझ येथील केंकरे इस्टेटची संरक्षण भिंत कोसळली आणि शेजारील घराचे देखील नुकसान.

Goa Rain Update
Rain Impact On Goa: ..होत्याचे नव्हते झाले! किनारे मोकळे, मासेमारी ठप्प, शॅक्समध्ये शुकशुकाट, शेतीचे नुकसान; पावसामुळे गोव्याला मोठा फटका

१०४ कॉल्स; २१ लाखांहून अधिक नुकसान

राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे आपत्कालीन संकटांसाठी झाड कोसळणे व इतर समस्यांसाठी १५ दिवसांत गोवा अग्निशमन दलाला १०४ हून अधिक कॉल्स आले आहेत. पाऊस व इतर आपत्कालीन प्रकारामुळे सुमारे २१ लाखाहून अधिक संपत्तीचे नुकसान झाले आहे तर ६४ लाखाहून अधिक संपत्ती आणि संसाधने वाचविण्यात दलाला यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com