IFFI Goa 2024: "केवळ पैसा असला म्हणजे चित्रपट बनवता येत नाही"; शेखर कपूर असं का म्हणाले?

Film Bazar Inauguration Ceremony: चित्रपट निर्मितीसाठी मनापासून आवड आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे असे मत ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर यांनी व्‍यक्त केले
Film Bazar Inauguration Ceremony: चित्रपट निर्मितीसाठी मनापासून आवड आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे असे मत ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर यांनी व्‍यक्त केले
Film Bazar Inauguration GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बुधवारी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. याच दरम्यान झालेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फिल्म बाजारच्या 15 व्या आवृत्तीचे उद्घाटन शेखर कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उपउच्चायुक्त निक मॅककॅफ्रे, केंद्रीय माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय जाजू, संयुक्त सचिव वृंदा देसाई, फिल्म बाजारचे सल्लागार जेरोम पेलार्ड उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी फिल्म बाजारमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, भूतानसह एकूण 10 देश सहभागी होणार आहेत आणि यांपैकी ऑस्ट्रेलिया हा देश कंट्री ऑफ फोकस असेल. बुधवारी फिल्म बाजारसह परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात येऊन चित्रपट बनवण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्सचे देखील अनावरण करण्यात आले आणि या कार्यक्रमात शेखर कपूर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

फिल्म बाजारसाठी येत असताना मला चित्रपट क्षेत्राशी निगडीत नव्या दमाचे अनेक तरुण भेटले. कोणी मला आपल्या प्रकल्पाबाबत सांगू इच्छित होता तर कोणी कथा ऐकवू पाहत होता. त्यांच्यातील उत्साह पाहून मी भारावलो आहे.

Film Bazar Inauguration Ceremony: चित्रपट निर्मितीसाठी मनापासून आवड आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे असे मत ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर यांनी व्‍यक्त केले
Sri Sri Ravi Shankar In IFFI: कलेतून लुटा मनमुराद आनंद! श्री श्री रविशंकर यांनी इफ्फीत कलाकारांना दिला जगण्याचा मूलमंत्र

अशांसाठीच या ‘फिल्म बाजार’ची निर्मिती केली गेली आहे. केवळ पैसा असला म्हणजे चित्रपट बनवता येतो असे नाही तर त्यासाठी मनापासून आवड आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे मत ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर यांनी व्‍यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com