Manushi Chhillar In IFFI: 'गुलाबी साडी अन् लाली लाल...', इफ्फीत मराठी गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड Viral Video
Manushi Chhillar In IFFIDainik Gomantak

Manushi Chhillar In IFFI: 'गुलाबी साडी अन् लाली लाल...', इफ्फीत मराठी गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड Viral Video

Bollywood actress Manushi Chhillar Viral Video: ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर इफ्फीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
Published on

Manushi Chhillar In IFFI

पणजी: गोव्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. महोत्सवात बॉलीवूडच्या बड्या सिने तारकांनी हजेरी लावत उद्घाटन सोहळ्याला चार चाँद लावले. यावेळी बी टाऊनच्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना विविध गाण्यांवर सादरीकरण केले.

ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर इफ्फीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यासह बॉलीवूडमधील सिनेकलाकार उपस्थित होते.

Manushi Chhillar In IFFI: 'गुलाबी साडी अन् लाली लाल...', इफ्फीत मराठी गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड Viral Video
Sri Sri Ravi Shankar In IFFI: कलेतून लुटा मनमुराद आनंद! श्री श्री रविशंकर यांनी इफ्फीत कलाकारांना दिला जगण्याचा मूलमंत्र

उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, आर. के. सेल्वमणी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार प्रसून जोशी, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, अभिनेता जयदीप अहलावत, अभिनेता नागार्जुन अक्कीनेनी, आर. सरथ कुमार, राजकुमार राव, अभिनेत्री प्रणिता सुभाष, अभिनेता रणदीप हुड्डा, अभिनेत्री नित्या मेनन, सान्या मल्होत्रा, अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर उपस्थित होते.

B-Town च्या उपस्थित कलाकारांनी यावेळी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. भूमी पेडणेकर, मानुषी छिल्लर, सान्या मल्होत्रा, इशान खट्टर यांनी सादरीकरणात सहभाग घेतला.

Manushi Chhillar In IFFI: 'गुलाबी साडी अन् लाली लाल...', इफ्फीत मराठी गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड Viral Video
IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

मानुषी छिल्लरने यावेळी मराठी गाणे गुलाबी साडी अन् लाली लाल... या प्रसिद्ध मराठी गाण्यावर डान्स केला. मानुषीने बॉलीवूड मिक्स गाण्यावर देखील सादरीकरण केले.

इफ्फीच्या रेड कार्पेट सोहळ्याला बॉलीवूडच्या सिने तारकांनी हजेरी लावली होती. B-Town च्या कलाकारांनी रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com