IFFI Goa 2024: ‘बॅटर मॅन’ चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ; काळजाचा ठाव घेणारा सुरेख अनुभव

Robbie Williams Biopic Premiere: ‘बॅटर मॅन’ हा ऑस्ट्रेलियन चित्रपट इफ्फीच्या शुभारंभीचा चित्रपट होता. रॉबी विलियम्स या विख्यात ब्रिटिश पॉप गायकाच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट आहे.
IFFI Goa 2024: ‘बॅटर मॅन’ चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ; काळजाचा ठाव घेणारा सुरेख अनुभव
Australian Movie Batter Man Dainik Gomantak
Published on
Updated on

ज्ञानेश मोघे

भारतीय लोककला आणि शिल्पांमध्ये असलेल्या विविध शैलींच्या मोरांच्या दृश्यरचना मधुर संगीताच्या सुरा-तालांवर सुंदर तऱ्हेने साकार होत राहिल्या आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा लोगो असलेला मोर पडद्यावर वेधकपणे अवतीर्ण झाला. महोत्सवातील सिनेमांच्या प्रदर्शनाला अशी देखणी सुरुवात लाभली. 

‘बॅटर मॅन’ हा ऑस्ट्रेलियन चित्रपट इफ्फीच्या शुभारंभीचा चित्रपट होता. रॉबी विलियम्स (Robbie Williams) या विख्यात ब्रिटिश पॉप गायकाच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट ध्वनी (संगीत विशेषत:) आणि दृश्य या दोन्ही माध्यमांतून प्रेक्षकांवर पकड घेणारा एक सुरेख अनुभव होता. या सुरेख अनुभवाने ५५व्या इफ्फीची सुरुवात निश्चितच आनंददायक बनवली. 

IFFI Goa 2024: ‘बॅटर मॅन’ चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ; काळजाचा ठाव घेणारा सुरेख अनुभव
IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

बॅटर मॅन (एक चांगला मनुष्य) बनण्यासाठी प्रचंड लोकप्रियता लाभणाऱ्या पॉप गायकाला कुठल्या संघर्षातून जावे लागते, हे हा चित्रपट फारच रंगतदारपणे सांगतो. लोकप्रियता मिळवल्यानंतर माणसाच्या समोर आव्हान म्हणून जशा बाह्य शक्ती सामोऱ्या ठाकतात, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्याचे स्वतःचे आंतरिक विकार त्याच्यासमोर आव्हान बनून उभे ठाकलेले असतात. रॉबी विलियम्स देखील अशा आव्हानांना अपवाद नव्हता.‌

लोकप्रियतेच्या झंझावातात जसजसे त्याचे व्यक्तिमत्त्व नशा, अहंकार, स्वार्थ यांच्या जाळ्यात अडकत जाते, तसतसा त्याच्यामधला माणूस रसातळाला जात राहतो. या साऱ्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा या साऱ्यातून बाहेर येण्याचा मार्ग त्यालाच शोधावा लागतो आणि तो मार्गच त्याला शेवटी एक बॅटर मॅन बनवतो. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक मायकल ग्रेसी यांनी रॉबी विलियम्सला चिंपांझीचे रूप दिले आहे. अनेक स्तरावर हे रूप आपल्याला वेगवेगळ्या वेळी इतके अनुरूप वाटते की सिनेमा पाहताना जगण्यातील चंचल वेळा आठवून एका बेसावध क्षणी आपल्याला आपल्यातले माकडही आठवते.

बाकी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बॉबी विलियम्स स्वतःच म्हणतो की इतर लोक मला जसे पाहतात तसा मी स्वतःला पाहत नाही. तो स्वतःला माकड (Monkey) म्हणून पाहत असेल का याचे उत्तर मात्र तिथे नाही. काही असले तरी त्याच्या आतील माकडापासून उत्क्रांत होत स्वतःला ‘बॅटर मॅन’ बनवेपर्यंतचा त्याचा प्रवास मायकल ग्रेसीने अद्भुत खेळ करत मांडला आहे. 

IFFI Goa 2024: ‘बॅटर मॅन’ चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ; काळजाचा ठाव घेणारा सुरेख अनुभव
IFFI Goa 2024: सिनेरसिकांची निराशा! एक दिवसाची जीवाची इफ्फी आता बंद; संपूर्ण कालावधीसाठी करावी लागणार नोंदणी

एका गतिमान संगीतिकेच्या माध्यमातून एका लोकप्रिय पॉप गायकाची जीवन कथा सांगताना त्याच्या जीवनातील चढउतार, नातेसंबंधातील गुंतागुंती, त्याचा उत्कर्ष, त्याचे स्खलन, त्याचे पुनरुत्थान या साऱ्याचे दर्शन घडवताना दिग्दर्शकाने अतिवास्तववादी (सर रियलिस्टिक) प्रतिमांची आणि दृश्यांची योजना अतिशय कल्पकतेने केली आहे.

एक चमकदार आयुष्य पडद्यावर सादर करताना प्रत्येक दृश्य रचनेतील लखलखाट हा जणू त्या गायकाच्या (बऱ्या-वाईट) प्रतिमेची सार्थ ओळख दर्शकांना देत राहतो आणि काळाचे अंतरही सहज ओलांडतो. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक मायकल ग्रेसी या उद्घाटनाच्या खेळाला हजर राहू शकले नाहीत परंतु सिनेमाच्या सुरुवातीपूर्वी दाखवल्या गेलेल्या क्लिपमधून त्यांनी बॉलीवूड चित्रपटाचा त्यांच्यावर असलेल्या प्रभावाबद्दल त्यांनी सांगितले.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्यांचा आवडता अभिनेता आहे असेही ते म्हणाले. असे असले तरी बॉलीवूड शैलीचे संगीत चित्रपट आणि बॅटरमॅन ही संगीतिका यांची तुलना करायची झाल्यास डोक्यावर उलट्या उभ्या असलेल्या (बॉलीवूड) संगीतिकेला त्यांनी पायावर सरळ उभे केले आहे असेच म्हणावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com