Goa Politics: गोव्यात महाआघाडीचे समीकरण जुळणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाची शक्यता

Sharad Pawar Meeting in Goa Latest News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विरोधकांची महाआघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Sharad Pawar Meeting in Goa Latest News
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विरोधकांची महाआघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) सहभाग असण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी दिले.

विश्रांतीसाठी गोव्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची डिसोझा यांनी आज कासावली येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीत सुमारे पाऊण तास चर्चा झाली. राष्ट्रीय पातळीवर जागावाटप आणि आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

Sharad Pawar Meeting in Goa Latest News
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

राष्‍ट्रवादी काँग्रेसला मिळणार यश

गोव्यात भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पवार यांचेही मत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यात सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केल्याचा दावा डिसोझा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com