विजय सरदेसाई अन् गोविंद गावडे यांच्यात रंगला कलगीतुरा

गावडेंना करून दिले भुजबळांचे स्मरण !
Goa News
Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील कलाकारांची शिखर संस्था असलेल्या कला अकादमीचे नूतनीकरण आता विधानसभेत पोचले असून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कला व संस्कृतीमंत्री तथा कला अकादमांचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना अक्षरश: भारेवर धरले. या नूतनीकरणात अनेक गैरप्रकार आहेत. याप्रकरणी कोणी न्यायालयात गेले तर महाराष्ट्र सदनप्रमाणे संबंधित मंत्री वा अधिकारी तुरुंगात जातील असे सांगून सभागृहात खळबळ माजविली. यावर संतप्त झालेल्या गावडे यांनी तितक्याच चढ्या आवाजात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. (Goa Forward MLA Vijai Sardesai criticizes Arts and Culture Minister and Arts Academy President Govind Gawde )

Goa News
ज्योशुआ डिसुझा यांनी एमपीडीए अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

विधानसभेच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात फातोड्यांचे आमदार सरदेसाई यांनी कला अकादमीच्या नूतनीकरण आणि संवर्धनाबाबत प्रश्न विचरला होता. या तारांकित प्रश्नावर सरदेसाई यांनी मंत्री गावडे यांच्यावर गंभीर आरोप करत कोण ते चार्ल्स कुरैय्या ? असे म्हणणाऱ्या मंत्र्यांना पद्मभूषण आणि गोमंतभूषण पुरस्कारप्राप्त रॉयल आर्किटेक्ट माहिती असू नयेत हे कितपत योग्य आहे, असे म्हणत चार कोटीत बांधलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी 39 कोटी रुपयांची मंजुरी मिळते आणि प्रत्यक्षात 49 कोटी खर्च केले जातात. यात मोठा गैरव्यवहार झाल्याचेदिसून येत आहे. असे ते म्हणाले.

नूतनीकरणाची निविदा न काढताच आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची कार्यपुस्तिकाची अंमलबजावणी न करता केलेल्या या कामाविरोधात कोणी न्यायालयात गेल्यास महाराष्ट्र सदनप्रकरणी ज्या प्रकारे देवेंद्र फडवणीस यात गेले आणि संबंधित मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले, तीच परिस्थिती राज्यात घडू शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, असा आग्रह सरदेसाई यांनी धरला होता.

Goa News
फरार खुनी आरोपीला 20 वर्षानंतर अटक

सरदेसाई यांनी आक्रमकपणे यावर मंत्री गावडे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरदेसाई यांच्यावर जोरदार शब्दफेक सुरू केली. कला अकादमीचे सर्व व्यवहार हे कायदेशीर असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीने केले आहेत. या संस्थेचे नूतनीकरण करणार हे कलाकारांसाठी जे महत्वाचे आहे तेवढेच वा वास्तूच्या संरक्षणासाठीही महत्त्वाचे आहे. या इमारतीचे डिझाईन्स दोषपूर्ण असून प्रत्येक पावसाळ्यात मुख्य सभागृहाबरोबरच ब्लॅक बॉक्समध्येही पाणी भरते. ही गळती यासाठी चक्क 65 सेंटीमीटरचा स्लॅब घातला आहे. तरीही गळती सुरूच आहे. असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com