Margao SOPO Tax: सोपो गोळा निविदेचे त्रांगडे सुटेना, एसजीपीडीए - मडगाव पालिकेत चढाओढ

Margao SGPDA Market Sopo Tax: ‘एसजीपीडीए’ घाऊक मासळी मार्केटमध्ये सोपो गोळा करण्यावरून ‘एसजीपीडीए’ व मडगाव नगरपालिका यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे.
Margao SGPDA Market Sopo Tax
Margao SGPDA Market Sopo TaxX
Published on
Updated on

Margao SGPDA Market Sopo Tax Dispute

सासष्टी: घाऊक मासळी मार्केटमधील सोपो गोळा कंत्राटासाठी निविदा ३१ जानेवारी २०२५पर्यंत जाहीर केली जाईल व लगेच योग्य कंत्राटदाराकडून सोपो गोळा केला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत त्यासाठी कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही.

‘एसजीपीडीए’ घाऊक मासळी मार्केटमध्ये सोपो गोळा करण्यावरून ‘एसजीपीडीए’ व मडगाव नगरपालिका यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. सध्या महिना १२ लाख रुपये सोपो गोळा केला जातो व ‘एसजीपीडीए’चा डोळा महिना ३० लाख रुपयांवर आहे.

सोपो गोळा करण्यात घोटाळा वगैरे होत नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सोपो गोळा करण्यावरून चर्चा करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासंदर्भात काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही.

‘एसजीपीडीए’ सोपो गोळा करण्यासाठी निविदा जाहीर करून कंत्राटदार नियुक्त करणार असे २०२२ पासून सांगण्यात येत आहे. प्रथम जानेवारी २०२३ पूर्वी, नंतर डिसेंबर २०२४ व आता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मध्यंतरी सोपो गोळा करण्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. पण त्यातील अटींवरून पुन्हा वाद सुरू झाला. हा प्रश्न सरकार दरबारीही उपस्थित करण्यात आला.

Margao SGPDA Market Sopo Tax
Mapusa Sopo Tax : म्हापशात वाढीव सोपोमुळे विक्रेत्यांत संभ्रम!

निविदा प्रक्रिया सुरू

‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष व वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी अजून यासंदर्भात निविदा जाहीर केली नसल्याचे मान्य केले आहे. सध्या निविदा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एसजीपीडीए’मधील प्रशासकीय गुंतागुंतीमुळे थोडा विलंब झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘एसजीपीडीए’चे सदस्य सचिव शेख अली यांची बदली झाली आहे व नवीन सदस्य सचिवाची नियुक्ती होईपर्यंत निविदा जाहीर करणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Margao SGPDA Market Sopo Tax
Margao: 'सोपो'प्रकरणी मडगाव पालिकेला नोटीस, निविदा प्रक्रिया अयोग्‍य असल्याचा दावा

इमारतीचे काम पूर्ण

घाऊक मासळी मार्केटमधील नवीन इमारतीचे उद्‌घाटन प्रमुख सुविधा उपलब्ध केल्या नसताना घाईगडबडीत २६ जानेवारी २०२५ रोजी करण्याचा घाट होता. मात्र, आता परत एकदा इमारतीचे उद्‌घाटन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ही इमारत ‘जीएसआयडीसी’तर्फे बांधण्यात येत आहे. ‘जीएसआयडीसी’च्या म्हणण्याप्रमाणे इमारतीचे काम पूर्ण झाले असून उद्‌घाटनाची तारीख ठरविण्याची जबाबदारी सरकार व ‘एसजीपीडीए’ची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com