Mapusa Sopo Tax : म्हापशात वाढीव सोपोमुळे विक्रेत्यांत संभ्रम!

अलीकडेच्या म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत मार्केटमधील सोपो करात वाढ करण्यात आली आहे.
Mapusa Sopo Tax
Mapusa Sopo Tax Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa : म्हापसा येथील मार्केटमधील वाढीव सोपो करावरून सध्या बाजारपेठेत संभ्रम तयार झाला आहे. केवळ पाच रूपयेच सोपो दरात वाढ केल्याचा दावा म्हापसा नगरपालिका करत असली तरी पालिका कर्मचारी वर्गाकडून कथित दरापेक्षा अधिक वसुली केला जात असल्याचा आरोप स्थानिक विक्रेत्यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या की, मुळात मार्केटमधील सोपो करामध्ये पालिका मंडळाने जास्त वाढ केलेली नाही. केवळ पाच रुपये वाढ केली आहे. या करासोबत कचरा कराची 5 रुपये रक्कम एकत्रित घेतली जात असल्यामुळे विक्रेत्यांत कदाचित संभ्रम निर्माण झाला असावा. नवीन करानुसार फक्त 15 आणि 25 रुपये अशी सोपो कराची रक्कम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपलब्ध माहितीनुसार, अलीकडेच्या म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत मार्केटमधील सोपो करात वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरानुसार शेडबाहेर बसणाऱ्या पदविक्रेत्यांना 15 रुपये तर शेडच्या आतमध्ये बसणाऱ्यांना 25 रूपये प्रती मीटर तसेच दोन्ही विक्रेत्यांना कचरा कर 5 रूपये, असा दर लागू करण्याचा निर्णय घेतलेला. त्यानुसार पालिकेने दि.1 जूलैपासून पालिका कर्मचार्‍यांमार्फत सोपो वसूलीची ही प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नव्या सोपो दराची माहिती देणारे फलकही उभारलेत.

मात्र, प्रत्यक्षात हा सोपो गोळा करताना कचरा करासह 1 मीटरला 30 ऐवजी 40 रूपये तर तीन मीटरच्या कॉटला 50 ऐवजी 90 रूपये वसूल केले जाते. याशिवाय शुक्रवारी व रविवारी नवीन पदविक्रेत्यांकडूनही मोठी रक्कम वसूल केली जाते. निश्चित दरापेक्षा अधिक रक्कम वसूल करून पालिकेने सोपोच्या नावे कथित लुबाडणूक चालवल्याचा आरोप या विक्रेत्यांनी केला आहे.

Mapusa Sopo Tax
Mapusa Market : म्हापसा भाजी मार्केटच्या छताला गळती; पालिकेकडून आश्‍वासनेच

फेरीविक्रेता सेनेचे अध्यक्ष सुदेश हसोटीकर म्हणाले की, बाजारपेठेत फुलांचे मार्केट, भाजी मार्केट, मडकी मार्केट व मासळी मार्केट हीच ठिकाणे शेडमध्ये येतात. पदपथ व रस्ते हे शेडमध्ये येत नाहीत. सध्या दुकान इमारतींच्या छताचे काँक्रीटचे तुकडे कोसळताहेत. त्यातून पावसाचे पाणी झिरपणे सुरू असते. आणि पदपथांवर पावसाची वावझड बसते. अशावेळी ते शेडमध्ये अंतर्भाव करणे योग्य नव्हे. त्याचबरोबर या शेडमध्ये सोपोचा नवा दर 25 व 5 रूपये मिळून 30 रूपये असताना, सरसकट 40 रूपये वसूल केले जाते, असा दावात्यांनी केला.

म्हापसा पालिकेकडून मार्केटमधील पदविक्रेत्यांना कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा दिली जात नाही, किंवा शौचालय नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. असे असताना, सोपो करात वाढ करण्यापेक्षा या सुविधा बाजारात उपलब्ध करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी हसोटीकर यांनी यावेळी केली.

ठोस आश्‍वासनाचा अभाव

बाजारात पहाटेच्या सुमारास भाजी, मासळी व इतर घाऊक माल घेऊन येणार्‍या वाहनांना पालिका मंडळाने सोपो दर लागू केला आहे. लहान वाहनाला 300 रू. तर मोठ्या वाहनांना 500 रूपये. यापूर्वी या वाहनांकडून सोपो कंत्राटदार 50 रूपये सोपो कर घेत होता. या वाहनदारांनी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांची सोमवारी भेट घेतली व हा कर कमी करण्याची मागणी केली. पण या वाहनदारांना नगराध्यक्षांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com