Waste Water: पणजीतील ‘स्मार्ट सिटी'च्या कामावर शंका; नवीन वाहिनी टाकल्यावरही चेंबर भरून वाहू लागले

परिसरात दुर्गंधी: रहिवाशांना नाहक त्रास
Waste Water:
Waste Water: Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी शहरालगतच्या भाटले परिसराची सांडपाण्याची समस्या मंगळवारी निर्माण झाली. अधून-मधून या मळा व या परिसरात सांडपाण्याची समस्या उद्‍भवण्याच्या प्रकारामुळे नाररिकांत नाराजी पसरली आहे.

Waste Water:
Goa Fake Call: युवतीच्या खुनाचा बनावट फोन पोलिसांची भंबेरी...

मंगळवारी भाटले परिसरातील सटी मंदिर परिसरात सांडपाण्याचे चेंबर भरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना व या परिसरातील रहिवाशांना या सांडपाण्याची दुर्गंधी सहन करावी लागली. अखेर याविषयी ‘मनपा’कडे तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या व मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या परिसरात भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम काही महिन्यांपूर्वीच झाले आहे. परंतु तोपर्यंत काही दिवसांतच चेंबर भरून वाहन्याचे प्रकार घडल्याने इतर यंत्रणेबाबत आता प्रश्‍न उपस्थित होत आहे. कर्मचाऱ्यांनी चेंबर उघडून मशिनच्या साह्याने मार्ग प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला.

Waste Water:
Goa Crime News: गोलतकर खूनप्रकरणी गौरीश गावस याला सशर्त जामीन

परंतु या परिसरात पसरलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. पादचारी असो, की दुचाकीस्वार असो, अनेकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला.

‘चेंबर’वाहू लागल्याने शंका !

‘स्मार्ट सिटी मिशन’अंतर्गत पणजी शहरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम झाले आहे. मलनिस्सारण वाहिनी टाकल्याने आणि नव्याने चेंबरची उभारणी केल्याने ही यंत्रणा निर्दोष असेल, असे वाटत होते. परंतु काही दिवसांतच चेंबर भरून वाहू लागल्याने शंका उद्भवू लागली आहे. अगोदरच महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या कामाबाबत आम्हाला विश्‍वासात घेतले जात नसल्याची तक्रार करीत आली आहे. दरम्यान, या प्रभागाच्या महिला नगरसेवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com