Savio Rodrigues : पोर्तुगीजांनी उद्वस्थ केलेली फक्त मंदिरेच नव्हे तर चर्चसाठी देखील समिती स्थापन करा

गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी पाचजणांची समिती स्थापन
Savio Rodrigues
Savio RodriguesDainik Gomantak

Savio Rodrigues : धर्मनिरपेक्षतेच्या भावनेने गोवा सरकारने पोर्तुगीज राजवटीत उध्वस्त झालेल्या कॅथलिक चर्चच्या अभ्यासासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्स यांनी मुख्यमंत्री व पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांकडे ट्विट करत केली आहे.

Savio Rodrigues
ABVP Protest: सेंट झेवियर कॉलेजच्या प्रांगणात 'अभाविप' चे धरणे आंदोलन

ट्विटमध्ये असे नमूद केले आहे की, "मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री सुभाष फळदेसाई यांना माझी कळकळीची विनंती आहे की, पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेल्या मंदिरांचा अभ्यास करणारी समिती जशी स्थापन करण्यात आली आहे"

"तशीच खर्‍या धर्मनिरपेक्षतेच्या भावनेने सरकारने पोर्तुगीज राजवटीत उध्वस्त झालेल्या कॅथलिक चर्चच्या अभ्यासासाठी एक समितीही स्थापन केली पाहिजे" अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली.

Savio Rodrigues
Fatorda Attack Video : भयानक! फातोर्डात दुकानातील साथीदारावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला; पहा व्हिडिओ

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठीच्या स्थळांची शिफारस करण्यासाठी फोंडा येथील एज्युकेशन संस्थेच्या रवी नाईक महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला.

या समितीला 30 दिवसांत या स्थळांची शिफारस करण्याच्या सूचना करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समितीतर्फे राज्यातील उद्ध्वस्त मंदिरांचा अभ्यास करण्यात येणार आहेे. या अभ्यासानंतर तत्कालीन उद्ध्वस्त मंदिराची नेमकी माहिती, यादी उपलब्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com