Chandigarh Corporators Goa Tour: चंदीगड महानगरपालिकेचे नगरसेवक येणार गोव्यात, 'हे' आहे कारण...

प्रशासकांनी नगरसेवकांना केली सूचना
Chandigarh Corporators Goa Tour 2023
Chandigarh Corporators Goa Tour 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandigarh Corporators Goa Tour: चंदीगड महानगरपालिकेचे नगरसेवक चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. 26 जूनपासून हा अभ्यास दौरा असणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) सूचनेनुसार गोव्यात कचरा विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नगरसेवक त्याच प्लांटचे कामकाज पाहणार आहेत, समजून घेणार आहेत.

(Chandigarh Municipal Corporation)

प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी हे सुचविले होते. गेल्या वर्षीही नगरसेवकांनी गोवा आणि मुंबईला भेट देण्याचे नियोजन केले होते, मात्र प्रशासकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत इंदूर आणि नागपूर ही ठिकाणे निश्चित्त केली होती.

Chandigarh Corporators Goa Tour 2023
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ, दक्षिण गोव्यातील दरांत घट; वाचा आजच्या किमती

राष्ट्रीय स्वच्छतेच्या क्रमवारीत इंदूरने अव्वल स्थान पटकावला होता तर कचरा व्यवस्थापन आणि जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात नागपूर आघाडीवर होते. या दौऱ्यात सर्व राजकीय पक्षांचे 21 नगरसेवक सहभागी झाले होते.

आता चंदीगडमधील डड्डूमाजरा येथील नवीन कचरा प्रकल्पाला विरोध होत आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा या प्लांटला विरोध असल्याने प्रशासकांनी नगरसेवकांना गोव्याला भेट देऊन 'नीरी'च्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास करावा, अशी सूचना केली आहे.

चंदीगडमधील कचरा प्रकल्पदेखील नीरी च्या मार्गदर्शनाखाली उभारला जाणार आहे, त्यामुळे गोव्यातील प्लांट पाहण्यासाठी नगरसेवक 26 ते 30 जून या कालावधीत गोव्याचा अभ्यास दौरा करणार आहेत.

Chandigarh Corporators Goa Tour 2023
Monsoon Update: अल निनोमुळेच पाऊस विस्कळीत, गोव्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी आठवडाभराची वाट पाहावी लागणार

दरम्यान, या दौऱ्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी झाली आहे. दादुमाजरा येथे नवीन प्लांटला आपचा विरोध आहे. त्यामुळे नगरसेवकांना गोव्यात पाठवायचे की नाही, असा पेच आपसमोर आहे.

तर हा चंदीगडच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने काँग्रेसचे नगरसेवक या दौऱ्यात सहभागी होतील, ते गोव्याला जातील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एच. एस. लकी यांनी म्हटले आहे.

गोवा अभ्यास दौऱ्यासाठी 26 जून ही तारीख निश्चित केली आहे. मात्र, तिकीट आणि इतर बुकिंगनुसार अंतिम तारीख ठरवली जाईल. गोव्यात नीरीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्लांटचा सर्व नगरसेवक अभ्यास करतील, असे महापौर अनूप गुप्ता यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com