Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ, दक्षिण गोव्यातील दरांत घट; वाचा आजच्या किमती

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात.
Petrol Diesel Prices In Goa
Petrol Diesel Prices In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price: जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

शुक्रवारी 16 जून रोजी गोव्यातील इंधन दरांमध्ये बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजी येथील दरांमध्ये वाढ झाली असून दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट झाली आहे.

उत्तर गोवा आणि पणजीमध्ये पेट्रोलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 26 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांमध्ये 11 पैशांची घट झाली. डीझेल दरांमध्ये पणजी आणि उत्तर गोव्यात प्रतीलीटर 24 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यात 11 पैशांची घट झाली.

Petrol Diesel Prices In Goa
8th Pay Commission: मोदी सरकारचा बदलला मूड, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार आणणार 8 वा वेतन आयोग!

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

Petrol Diesel Prices In Goa
Pradhan Mantri Matru Vandana Yojana: विवाहित महिलांसाठी सरकारची जबरदस्त योजना, खात्यात येणार एवढे हजार!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com