Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

नागवा, पर्रामध्ये अधिकाऱ्यांकडून पदांचा गैरवापर

विश्‍वजित राणेंचा आरोप; नव्या समितीमुळे खाते पारदर्शक होण्याची आशा
Published on

पणजी : नागवा, पर्रासह अनेक ठिकाणचे बाह्य विकास आराखडा तयार करण्यात आले. मात्र, यावेळी नियोजन आणि विकास प्राधिकरणावरील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पदांचा गैरवापर करून अनेक भू रूपांतर केल्याचा आरोप नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी केला आहे. बुधवारी सोशल मीडियावर ट्विट करत त्यांनी ओडीपीवर पुन्हा एकदा भाष्य केले.

Vishwajit Rane
...म्हणून मडगाव पालिकेत प्रशासकीय खोळंबा

‘मुख्य नगर नियोजक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने पुनरावलोकन केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. यासाठी नगर नियोजन खात्याच्या योग्य नियोजनासाठी सल्लागार पदाची आवश्यकता आहे. नवी समिती गोव्याच्या सौंदर्याचे वेगळेपण जपत आवश्यक तेवढेच बदल करेल. ज्यामुळे नगरनियोजन खात्याचा सर्व कारभार पारदर्शक बनेल’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे

Vishwajit Rane
...तर राज्यात कोरोनाच्‍या चौथ्या लाटेची शक्‍यता

मुख्य नगर नियोजक यांच्या अध्यक्षतेखालील समितीची एक बैठक पार पडली आहे. ही समिती सर्व ओडीपींची नव्याने तपासणी करत आहे. त्यातील बदलही लक्षात घेतले जात आहेत. अनेक ठिकाणी खाजन जमिनीचे रूपांतर केले असून अयोग्य मार्गाने प्रकल्प उभारणीसाठी सूट देण्यात आलेली आहे. समितीने दिलेली सर्व नावे नगरनियोजन खाते लवकरच जाहीर करून समितीच्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करेल असेही मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com