Women’s Day 2023 : देवाने दिलेल्या देणगीचं सोनं करा : सीया पंडित

महिला दिनी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना सलाम!
Seeya Pandit
Seeya PanditDainik Gomantak
Published on
Updated on

Women’s Day 2023 : कला ही परमेश्‍‍वराने दिलेली देणगी असते. ती सहसा कुणाला मिळत नाही. देवाने दिलेल्या या देणगीचं सोनं करणं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. पण त्यासाठी साधना, एकाग्रता आणि संयम असावा लागतो.

असा संयम आणि एकाग्रता हे गुण अंगात असलेली एक कलाकार म्हणजे सीया अतुल पंडित असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. घोगळ-मडगाव येथे राहणारी सीया पंडित ही सध्या फ्रीलान्सिंग करते.

भाटीकर मॉडेल हायस्कुलात दहावीपर्यंतचे आणि मग पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन आल्तिनो-पणजी येथील गोवा कला महाविद्यालयात तिने पेंटिंग विभागामधून बॅचलर्स आणि मास्टर्स पदवी मिळविली आहे. 

Seeya Pandit
गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदा PWD विभागाला मिळाली महिला मुख्य अभियंता

गोवा कला महाविद्यालयात बीएफएला सलग चार वर्षे सीया पहिली आली. 2016-17 साली या परीक्षेतील पेंटिंग विभागात विशेष श्रेणी मिळवून तिने पहिला क्रमांक मिळविला.

बीएफएच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत जास्त गुण मिळविल्यामुळे ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिला प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं आहे आणि त्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे.

पेंटिंग खेरीज सीयाने कोकणी आणि मराठी पुस्तकांसाठीही मुखपृष्ठेही काढली आहेत. कला अकादमीच्या 2017च्या राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागात तिने तिसरा पुरस्कार मिळविला तर 2022च्या राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागात ती पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली.

प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनच्या गोवा राज्य पुरस्कारासह कला क्षेत्रातील अनेक पुरस्कार तिला लाभले आहेत. 

Seeya Pandit
Women’s Day 2023 : आशाताई... एक अभंग जिद्द!

समाजाकडून सोडाच, निदान घरच्या माणसांकडून तरी शाबासकी मिळायला हवी. खरं म्हणजे स्त्रीलाही स्वत:चे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. काम करताना चुका होणारच.

त्या चुका दाखवून त्यांना कमी लेखण्यापेक्षा त्यांच्यातील गुणांचे कौतुक केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. महिलादिनानिमित्त सर्वांनी हाच संकल्प करावा.

- सीया अतुल पंडित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com