गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदा PWD विभागाला मिळाली महिला मुख्य अभियंता

विद्यमान मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांच्याकडून त्या विभागाची सूत्रे हाती घेतील.
PWD
PWD Dainik Gomantak
Published on
Updated on

सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदा पहिली महिला मुख्य अभियंता मिळाली आहे. अँजेलिका लीना ओडेटा सरिता दा सिल्वा यांची PWD च्या मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली आहे.

अँजेलिका लीना ओडेटा सरिता दा सिल्वा सार्वजनिक बांधकाम विभाग आल्तिनो-पणजी येथील मुख्य कार्यालयात अधीक्षक सर्वेक्षक म्हणून कार्यरत होत्या. सिल्वा यांना आता विभागाच्या मुख्य अभियंता म्हणून बढती देण्यात आली आहे.

विद्यमान मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांच्याकडून त्या विभागाची सूत्रे हाती घेतील.

PWD
Fire in Goa : म्हादई, सत्तरीत अग्निप्रकोप; हेलिकॉप्टरचा वापर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अँजेलिका लीना ओडेटा सरिता दा सिल्वा यांची मुख्य अभियंता तर, ए जे जॉर्ज परेरा यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रस्ते आणि पूल विभागाचे मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती दिली आहे. परेरा आल्तिनो-पणजी येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court FAR Dues
Ireland Cricket Head Coach Heinrich Malan Resigns
Dicholi Water Supply Issue
Goa Forest Department reservation for disabled
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com