Ponda-Sanquelim Municipal Council Election 2023: साखळीत 144 कलम लागू; दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश

मतदान आणि मतमोजणी केंद्राभोवतालची हॉटेल्स बंद ठेवण्याचा आदेश
Ponda And Sanquelim Municipal Council
Ponda And Sanquelim Municipal CouncilDainik Gomantak

Ponda-Sanquelim Municipal Council Election 2023: साखळी पालिकेसाठी 5 मे रोजी मतदान होणार असून 7 मे रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांजवळ आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राजवळ लोकांची गर्दी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे.

या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी ५ मे रोजी सकाळी ६ ते संध्या ६ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत अनुक्रमाने मतदान आणि मतमोजणी केंद्राभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटस, आस्थापने, बार, चहाची दुकाने, पान शॉप, खानावळ, अन्नपदार्थ विकणारे धाबे, गाडे आणि इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मतदानादिवशी मतदान केंद्रापासून १०० मीटर भागात जमावबंदीचा आदेश लागू असल्याने मतदान केंद्रापासून १०० मीटर भागात ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी असेल.

Ponda And Sanquelim Municipal Council
Property Registration Fee : सहकारी संस्थांना मुद्रांक, नोंदणी शुल्कात सवलत

हा आदेश निवडणूक अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू नसेल. तसेच कामावरील लोकसेवक आणि मान्यता असलेले लग्न सोहळे, अंत्ययात्रा, धार्मिक सोहळे किंवा अशाप्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमास हा निर्बंध लागू नसेल.

परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घेतली पाहिजे.

दारू वाहतुकीवर निर्बंध

फोंडा आणि साखळी पालिकेच्या निवडणुकीमुळे दारू वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती कुटुंबातील सदस्यांसह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० मिलीच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकेल किंवा जवळ बाळगू शकते. हे निर्बंध ४, ५ आणि ७ मे रोजी संपूर्ण गोवा राज्यात लागू राहतील.

Ponda And Sanquelim Municipal Council
Churchill Alemao : सार्दिन, सरदेसाई यांनीच भाजपला राज्‍यात सत्तेवर आणले : आलेमाव

मतदारांना ५ मे रोजी भरपगारी सुट्टी

साखळी आणि फोंडा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ मे रोजी संबंधित क्षेत्रातील सरकारी व खासगी कर्मचारी मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. पालिका क्षेत्रात जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता प्रशासनाच्या वतीने ही सुट्टी जाहीर केली आहे.

दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश

साखळी आणि फोंडा निवडणुकीच्या मतदानादिवशी आणि मतमोजणीदिवशी ४, ५ आणि ७ मे रोजी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या मालकांनी ‘फक्त जेवण मिळेल’ असा फलक बाहेर लावावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com