Property Registration Fee : सहकारी संस्थांना मुद्रांक, नोंदणी शुल्कात सवलत

सवलत 1 मे पासून सुरू केली जाणार
discount In Stamp, Registration Fees
discount In Stamp, Registration FeesDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात 31 मार्च 2014 पूर्वी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांद्वारे विक्री खत केलेल्या लहान निवासी व सहकारी संस्थांसाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात एक टक्का सवलत दिली जाणार आहे. ही सवलत 1 मे पासून सुरू केली जाणार असून ती तीन महिन्यांसाठी असेल. या मुदतीत नोंदणी करणाऱ्या संस्थांनाच त्याचा लाभ मिळणार आहे.

ही सवलत 1 मे पासून पुढील तीन महिन्यांसाठी आहे. मालमत्तेच्या सध्याच्या बाजार मूल्याच्या एक टक्का दराने ती लागू केली जाईल. त्यामध्ये खरेदीपत्र वा डीड ऑफ कन्व्हेयन्स किंवा डीड ऑफ ट्रान्स्फर किंवा सामंजस्य करार या नोंदणीचा समावेश असला पाहिजे.

discount In Stamp, Registration Fees
Sanquelim Municipal Council Election 2023: रुसवे-फुगवे, मनधरणी हे भाजपसमोर आव्हान; साखळीत मुख्यमंत्र्यांचा प्रचारावर जोर

महसूल वाढणार

सध्याच्या मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात एक टक्क्याने सूट देऊन अधिकाधिक संस्थांची नोंदणी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक सहकारी संस्थांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात घट झाली आहे.

बहुतेक सहकारी संस्था स्थापनही झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारचा बराच महसूल बुडतो. या संस्थांची नोंदणी करून त्यांना कायदेशीर स्वरूप मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com