Churchill Alemao : सार्दिन, सरदेसाई यांनीच भाजपला राज्‍यात सत्तेवर आणले : आलेमाव

पलटवार : मोपा विमानतळाची निर्मिती राणे व सार्दिनमुळेच
Churchill Alemao
Churchill Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार असे मी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कारण सर्वत्र हवाच तशी आहे. फ्रान्‍सिस सार्दिन यांचे नावसुद्धा मी घेतले नव्हते किंवा विजय सरदेसाईंबद्दलही बोललो नव्हतो.

त्यामुळे सार्दिन यांना पत्रकार परिषदेत माझ्या नावाचा ‘जयजयकार’ करण्याची व विजयला मी म्हातारा झालो आहे असे म्हणण्याची गरजच नव्हती. भविष्यात मी भाजपमध्‍ये प्रवेश करणार की नाही हे या घडीला सांगू शकत नाही.

पण एक मात्र खरे, गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आणण्यास फ्रान्‍सिस सार्दिन व विजय सरदेसाई हेच जबाबदार आहेत, अशा शब्‍दांत माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोघांवरही पलटवार केला.

Churchill Alemao
Panaji Smart City Work: घ्या! पणजीत आणखी एक ट्रक रुतला; 'स्मार्ट सिटी'च्या निकृष्ट कामाचं नवं उदाहरण

1999 साली काँग्रेस पक्ष सोडून सार्दिन भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले व तेथूनच त्‍या पक्षाने गोव्‍यात भरारी मारली. आता नजीकच्‍या काळात तरी या पक्षाला सत्तेपासून कोणी रोखू शकत नाही. दुसरीकडे 2017 मध्ये विजय सरदेसाई हे स्व. मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा देत स्वत: उपमुख्यमंत्री बनले. याचा अर्थ भाजपला वर येण्‍यास हातभार कोणी लावला? असा सवाल चर्चिल यांनी उपस्‍थित केला.

हल्लीच्या काळात गोव्यात अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून जास्त काळ टिकू शकत नाही. डॉ. प्रमोद सावंत हे बहुजन समाजाचे नेते आहेत व म्हणूनच मी त्यांना पाठिंबा देत आहे, असेही ते म्‍हणाले.

माझी राजकीय कारकिर्द प्रामाणिक आहे. राजकारणात कोण कोणाचा मित्र व शत्रू नसतोच. राजकारण म्हणजे वारा आहे. सार्दिन हे शिक्षणमंत्री असताना त्‍यांनी केलेली गुणपत्रिका भानगड अजूनही लोक विसरलेले नाहीत, असा टोला चर्चिलने लगावला.

मोपा विमानतळ प्रतापसिंह राणे व फ्रान्‍सिस सार्दिन यांच्यामुळेच झाला. या विमानतळाला कॉंग्रेस पक्षच जबाबदार आहे. भाऊसाहेब बांदोडकर यानी झुवारीनगर येथे बिर्लाला १५ लाख चौरस मीटर जागा दिली होती. त्यांनी केवळ एक लाख चौरस मीटरचा वापर केला.

जर ‘सेव्ह गोवा’ पक्षाला १० जागा मिळाल्या असत्या तरी बाकी १४ लाख चौरस मीटर जागा परत घेऊन तिथे विमानतळाची निर्मिती केली असता असा दावा करून आता बिर्लाने त्या जागेवर ५२ हजार कोटी रुपये जमविले असल्‍याचे चर्चिल म्‍हणाले.

Churchill Alemao
Property Registration Fee : सहकारी संस्थांना मुद्रांक, नोंदणी शुल्कात सवलत

चर्चिल स्‍वार्थी माणूस : लोलयेकर

गोवा फॉरवर्डने राजकारणात जे निर्णय घेतले ते लपूनछपून नव्हेत तर सर्वांना समजून उमजून परिस्थितीनुरुप घेतले. २०१७ साली पक्षात मतभेद असतानाही पक्षाने सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला.

चर्चिल यांच्‍याप्रमाणे आम्ही स्वार्थ व पैशांसाठी पक्षनिष्ठा बदलत नाही, असा टोला गोवा फॉरवर्डचे सचिव मोहनदास लोलयेकर यांनी हाणला. चर्चिल यांच्‍याबद्दल बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय. गोमंतकीयांना त्‍यांची राजकीय कारकिर्द माहित आहे.

सध्‍याच्या परिस्थितीत राजकारणात चर्चिलची कोणतीही भूमिका नाही असे सांगून आमच्‍या पक्षाने लोकसभा निवडणुकीबाबत अजून विचार केलेला नाही. त्‍यावेळची स्‍थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल, असे लोलयेकर म्‍हणाले.

"मी अजून काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मी समर्थक आहे. माझे संपूर्ण जीवन मी फुटबॉलसाठी अर्पण केले. म्हणूनच अजूनपर्यंत चर्चिल ब्रदर्स हा संघ चालवतो. लोकसभा निवडणूक लढविण्याचा मी विचार केलेला नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत माझा मुलगा सावियो बाणावलीतून व मुलगी वालंका नावेलीतून निवडणूक लढविणार आहे."

चर्चिल आलेमाव, माजी मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com