Dabolim: उड्डाणपूलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून स्कूटरस्वाराचा मृत्यू, वास्को पोलिसांनी कंपनीविरुद्ध नोंदवला गुन्हा

Dabolim Flyover Accident Death: वास्को पोलिस स्थानकात संलग्न पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला.
Verna Accident
Verna AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळीजवळील उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी खड्ड्यात पडून ४६ वर्षीय स्कूटरस्वाराच्या मृत्यूप्रकरणी वास्को पोलिसांनी कंत्राटदार कंपनी व कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वास्को पोलिस स्थानकात संलग्न पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ मे २०२५ रोजी घडली, जेव्हा मृत मारुती जाधव, जो दाबोळीचा रहिवासी होता, तो दाबोळी मधील मटेरियल ऑर्गनायझेशन डेपो गेटजवळ, चार पदरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर त्याच्या होंडा डिओ स्कूटरवरून जात होता, त्यावेळी हा अपघात झाला.

Verna Accident
Dabolim Accident: कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी! उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार ठार

कंत्राटदार मेसर्स एम. वेंकट राव इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रकल्प व्यवस्थापक मिहीर कुमार आणि साइट सुपरवायझर संजय कुमार गुंजन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही कंपनी एमईएस कॉलेज जंक्शन आणि बोगमाळो जंक्शन दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम करत आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Verna Accident
Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या रनवेवरील लाईट्स पडल्या बंद; 3 मोपावर, एक फ्लाईट मुंबईला वळवली

निष्काळजीपणामुळे अपघात

पोलिसांनी सांगितले की, बांधकाम पथकाने उड्डाणपुलासाठी खांब उभारण्यासाठी त्या ठिकाणी खड्डा खोदला होता, परंतु त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात किंवा रस्त्यावरील वापरकर्त्यांसाठी पुरेशा सुरक्षा सूचना लावण्यात ते अयशस्वी ठरले. योग्य सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे जाधव नकळतपणे मोकळ्या खड्ड्यात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता मृत घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com