COVID-19 Restrictions
COVID-19 RestrictionsDainik Gomantak

गोव्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद

कोरोना बाधितांची वाढती संख्या राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
Published on

पणजी: गोव्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याकाळात ऑनलाइन पद्धतीने मुलांचा अभ्यास घेतला जाईल. कॅसिनो, सिनेमा हॉल, सभागृहे, क्रुज बोट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.

COVID-19 Restrictions
Goa Election कॉंग्रेस शेवटचा उमेदवार लवकरच घोषित करेल: पी. चिदंबरम

राज्य सरकारने (State Government) दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना (Students) शाळेत येण्याची परवानगी नाही. मात्र, ऑनलाइन वर्ग घेण्यासतही शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागेल. महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्था परीक्षांचे आयोजन वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील.

COVID-19 Restrictions
..या नंतरच होईल काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा:P Chidambarm

राज्य सरकारने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसिकरणाला सुरुवात झाली होती. राज्य व केंद्र सरकार लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सरकारने राज्यातील आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाच्या (Coronavirus) बुस्टर डोसची व्यवस्था केली आहे. राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास 28,000 लोक बुस्टर डोससाठी पात्र आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com