गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी चिदंबरम सध्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पी चिदंबरम यांनी TMC बाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यात चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. त्यातच त्यांनी संबंधित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या मुख्यमंत्री (CM Candidate) उमेदवारीबाबत स्पष्ट केले. (P Chidambaram informed about announcement of Congress Chief Ministerial candidate)
ते म्हणाले "मुख्यमंत्री पदासाठीसाठी निवड करण्यात येणारा चेहरा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Election) जाहीर करायचा की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडायचा हा निर्णय सर्व उमेदवारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल, विशेषत: नामांकन प्रक्रिया संपल्यानंतर या मुद्यावर चर्चा होईल असे त्यांनी वरिष्ठ निरीक्षक पी चिदंबरम यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच, तृणमूल काँग्रेसच्या युतीच्या दाव्याला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, गोव्यात युती करण्याची टीएमसीकडून सूचना होती, पण त्याआधी आणि त्यानंतरही खूप राजकीय घडामोडी झाल्या, दरम्यान; काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या युती विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. तसेच TMC ने लुइझिन्हो, रेजिनाल्डो या आमच्या नेत्यांना आमच्यापासून तोडून त्यांची एक प्रकारे शिकारच केली आहे. आसे आरोप करत ते पुढे म्हणाले; मला टीएमसीशी युती बाबत कोणत्याही चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.