School Activities: अभ्‍यासक्रमासोबत जीवनमूल्यांचे हसतखेळत शिक्षण

शिरगाव सरकारी शाळा : प्‍लास्‍टिकमुक्‍ती, भूजल संवर्धन, रस्‍ता सुरक्षा उपक्रम; मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
School Activities|Goa
School Activities|GoaDainik Gomantak
Published on
Updated on

School Activities: केवळ क्रमिक अभ्‍यासक्रमच नव्‍हे तर कृतिशील जीवनमूल्‍य मुलांमध्‍ये रुजविणारी शाळा म्‍हणून शिरगाव सरकारी प्राथमिक शाळेने लौकिक प्राप्‍त केला आहे. प्‍लास्‍टिक निर्मूलन, कचरामुक्‍ती, वाहतूक सुरक्षेसाठी पत्ररूपी उपक्रम या शाळेने सातत्‍याने राबविले आहेत.

या शाळेने गेल्‍या पाच वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. ‘प्‍लास्‍टिकचा भस्‍मासुर’ हा जीवसृष्‍टीसाठी मारक ठरत आहे. म्‍हणूनच लहान मुलांवर प्‍लास्‍टिकमुक्‍तीचा संस्‍कार रुजावा यासाठी अभिनव कार्यक्रम राबविण्‍यात आला. त्‍याअंतर्गत घरातील प्‍लास्‍टिक कचरा पाण्‍याच्‍या रिकाम्‍या बाटल्‍यांमध्‍ये भरून तो एकत्र करावा.

त्‍यात कॅरिबॅग्‍ज, अन्‍य पिशव्‍यांचा समावेश होता. लहान मुलांनी या उपक्रमात उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला. शिवाय असा उपक्रम राबविल्‍याने पालकही सजग झाले. प्‍लास्‍टिकचा वापर टाळावा, यासाठी त्‍यांच्‍यातही जागृती झाली.

School Activities|Goa
Covid Vaccination: गोव्यात कोविड लसीकरण मोहीम आजपासून सुरू

कागदी पिशव्‍यांवर भर

प्‍लास्‍टिकमुक्‍तीसाठी या शाळेने कागदी पिशव्‍या तयार करण्‍याचा उपक्रम राबविला. त्‍या अंतर्गत पालक-शिक्षक संघ तसेच मुलांनी मिळून कागदी पिशव्‍या तयार केल्‍या. गेल्या काही वर्षांत शिरगाव येथील देवी लईराईच्या उत्‍सवात कागदी पिशव्‍यांचे वितरण करण्‍यात येते.

कॅरिबॅग्‍ज टाळा, कागदी पिशव्‍या वापरा, असा संदेश देण्‍यात आला. जनजागृतीसाठी रॅलीही काढण्‍यात आली. या उपक्रमामुळे काही पालकांनी आत्‍मनिर्भरतेसाठी कागदी पिशव्‍या तयार करण्‍यावरही भर दिला.

School Activities|Goa
Illegal Boating: बेकायदा व्यवसाय करणाऱ्या बोटीला मिळाली जलसमाधी?

रस्‍ता सुरक्षेचा दिला मंत्र

रस्‍ता अपघातात अनेकांचा बळी जातो. अपघात कमी व्‍हावे यासाठी ‘हेल्‍मेट वापरा, तुम्‍ही तुमच्‍या कुटुंबीयांना हवे आहात’, असा संदेश देणारी पत्रे तयार करून ती सरकार, प्रशासन, महनीय व्‍यक्‍ती यांना पाठविण्‍यात आली. यातून रस्‍ता सुरक्षेबाबत जागृती झाली.

भूजल संवर्धनार्थ पाऊल : याच शाळेने भूजल संवर्धनार्थ पाऊल उचलले असून, शाळा परिसरात शोषखड्डा खणण्‍यात आला आहे. परिणामी कौलांतून येणारे पाणी त्‍या खड्ड्यात जमून ते जमिनीत मुरते. यामुळे जमिनीखालील पाण्‍याचा स्‍तर जपण्‍यास मदत होते. हा प्रयोग पाहून विनायक खेडेकर यांनी शाळेचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com