Verca: 'शाळा का चुकवली'? पालक ओरडल्याने 2 विद्यार्थी गोव्यातून पळाले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले भुसावळमध्ये

Missing Children Goa: शाळा चुकविल्याने पालकांनी रागाने विचारणा केली असता, घरातून दोघा अल्पवयीनांनी पळ काढल्याची घटना कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
School
StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

 मडगाव: शाळा चुकविल्याने पालकांनी रागाने विचारणा केली असता, घरातून दोघा अल्पवयीनांनी  पळ काढल्याची घटना कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पोलिसांत याविषयी तक्रार नोंद झाल्यानंतर  पोलिसांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्रातील भुसावळ येथे ते दोघे सापडले. अखेर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  

वार्का  येथील ही  मुले असून, त्यातील एक मूळ बिहार, तर दुसरा ओडिसा राज्यातील आहे. या मुलांच्या पालकांनी मुले बेपत्ता झाल्याची तक्रार शुक्रवारी कोलवा पोलिस ठाण्यात नोंदवली होती.  दोघेही इयत्ता  नववीमध्ये शिकत होते.

ते अधूनमधून शाळेला दांडी मारत असत. त्यामुळे पालकांनी त्यांना धारेवर धरले होते.   ५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शाळेतील शिक्षकांनी असाईनमेंट दिली असून शिकवणीला जात असल्याचे सांगून ते दोघेही घराबाहेर पडले होते.

School
Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

नंतर ते घरी परत न आल्याने चिंतातुर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.  कोलवा पोलिस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, ही मुले मडगाव रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाणाऱ्या गोवा एक्सप्रेस रेल्वेमधून पुढील प्रवासाला निघाल्याचे  सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले.

School
Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

पोलिसांनी याबाबत  रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ही माहिती दिली. रेल्वेच्या जवानांनी  त्या  दोघांना  भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरवून  ताब्यात घेतले. कोलवा पोलिस ठाण्याचे पथक या मुलांना आणण्यासाठी भुसावळकडे रवाना झाले आहे. या मुलांना गोव्यात आणल्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com