Bison Attack: शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला! आमदार गावडेंनी बोलावली तातडीची बैठक; अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Bison Attack Savoi Verem: स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी या विषयावर चर्चा करून गव्यांच्या दहशतीतून वाट काढण्यासाठी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
Bison Attack Goa
Bison Attack GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडकई: सावईवेरे येथे एका शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत घबराट पसरली असून स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी या विषयावर चर्चा करून गव्यांच्या दहशतीतून वाट काढण्यासाठी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. म्हार्दोळ येथील पंचायत संकुलात ही बैठक आज झाली. त्यावेळेला गव्यांना हाकलण्यासाठी विविध उपायांवर तसेच अन्य विषयांवरही चर्चा झाली.

आमदार गोविंद गावडे यांच्यासोबत फोंड्याचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वन खात्याचे व कृषी खात्याचे अधिकारी, म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच व पंच सदस्य उपस्थित होते.

गव्याच्या हल्ल्यामुळे प्रियोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गव्यांचा उच्छाद सध्या या मतदारसंघात सुरू असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज असल्यामुळे आमदार गोविंद गावडे यांनी ही तातडीची बैठक बोलावली होती.

Bison Attack Goa
Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

या बैठकीत नैसर्गिक आपत्ती तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासंबंधी चर्चा करण्यात आली. त्यात शेतीला सोलर फेन्सिंग बसवणे तसेच गव्यांना दूर हाकलून लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासंबंधी आमदार गोविंद गावडे यांनी गरीब शेतकरी सोलर फेन्सिंग बसवू शकत नाही, त्यामुळे किमान सत्तर टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचे सांगितले.

Bison Attack Goa
Bison Attack Goa: गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, बोणये-सावईवेरे परिसरातील डोंगर भागात हैदोस वाढला

सरकारी अधिकाऱ्यांनी मानपानाचा मुद्दा उपस्थित न करता सामाजिक कार्य या नात्याने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याचे गोविंद गावडे म्हणाले. एखादे धोकादायक झाड कापण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार दिले पाहिजेत, असे सांगताना सर्व खात्यांमध्ये त्यासाठी समन्वय असायला हवा, असे गोविंद गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com