Bison Attack Goa: गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, बोणये-सावईवेरे परिसरातील डोंगर भागात हैदोस वाढला

Bison Attack : बोणये-सावईवेरे भागातील धर्मा गिरोडकर हे येथील डोंगरावरील आपल्या मळ्यात गेले असता त्यांच्यावर गव्या रेड्याने हल्ला केला.
Bison Attack Goa
Bison Attack GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सावईवेरे: बोणये-सावईवेरे भागातील धर्मा गिरोडकर हे येथील डोंगरावरील आपल्या मळ्यात गेले असता त्यांच्यावर गव्या रेड्याने हल्ला केला. यात गव्या रेड्याचे शिंग त्यांच्या चेहऱ्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता.१४) सायं. ४ वा.च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, धर्मा गिरोडकर हे सोमवारी सायंकाळी आपल्या मळ्यात गेले होते. यावेळी पाऊस पडत होता. त्यांनी रेनकोट परिधान केला होता. त्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या गव्याची कल्पना आली नाही. अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला असता ते जखमी अवस्थेत खाली पडले. त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार लागला.

Bison Attack Goa
Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

अशा अवस्थेतच त्यांनी लोकांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन त्यांना उचलले. घरी आणल्यानंतर त्वरित त्यांना गोमेकॉत पाठविण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी (ता.१६) दुपारी त्यांना घरी पाठविण्यात आले.

Bison Attack Goa
Goa: 28 फेब्रुवारी 2014 पूर्वी बांधलेली घरं होणार कायदेशीर! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

बागायतदारांचे होते नुकसान

सावईवेरे हा गाव कुळागरांचा व डोंगराळ भाग असल्याने या पंचायत क्षेत्रातील घाणो, सावई, म्हातारभोग, शिलवाडा, बोणये या भागात गव्या रेड्यांचा वावर असतो. या भागातील बागायतदारांनी काबाडकष्ट करून लागवड केलेल्या पिकांची वारंवार गव्यांकडून नासधूस केली जाते. त्यामुळे अनेक बागायतदारांना नुकसान सोसावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com