Goa Politics: काँग्रेसचा ‘सेव्ह एसबीआय’चा नारा

काल काँग्रेसच्या दक्षिण गोवा समितीने मडगावच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियासमोर निदर्शने केली.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics Congress Protest: अदानी समूहाला केंद्र सरकार वाचवत असल्याचे कारण पुढे करून त्याविरोधात काल काँग्रेसच्या दक्षिण गोवा समितीने मडगावच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियासमोर निदर्शने केली.

मात्र, या निदर्शनाला अल्प प्रतिसाद लाभला. यावेळी मॉरिनो रेबेलो, सावियो रॉड्रिग्स यांच्यासह केवळ 18 ते 20 कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसतर्फे निदर्शने होणार म्हणून स्टेट बॅंकच्या प्रवेशद्वारावर पोलिस पहारा ठेवण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी आंदोलकांनी सेव्ह एसबीआय, सेव्ह एलआयसी अशा उल्लेखांचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.

Goa Politics
Culture Award: राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण लवकरच...

याप्रसंगी शेन रेबेलो यांनी सांगितले, की अदानी समुहात सरकारी बॅंकासह व विमा कंपन्यांचे करोडो रुपये गुंतलेले आहेत.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामन गप्प का आहेत? हा केवळ कंपनीचा मामला आहे असे म्हणून अर्थमंत्र्यांनी हात झटकणे योग्य नव्हे.

हा देशाच्या अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. अदानीचे नियंत्रण असलेल्या मुद्रा बंदरावर तीन हजार किलो वजनाचे ड्रग्स जप्त करण्यात आले. मात्र, त्यावर सरकार काहीही भाष्य करत नाही.

सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर देश आर्थिकदृष्ट्या घबाडघाईस येईल, अशी टीकाही शेन रेबेलो यांनी केली.

Goa Politics
Adani Group: गोव्यात अदानींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

लोकांमध्ये अदानी समुहाचा घोटाळा व सरकारची अनास्थेसंदर्भात जागृती करण्यासाठीच ही निदर्शने देशभर करण्यात येत आहेत.

जे लोक स्टेट बॅंक किंवा विमा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात त्यांना जागृत करण्यासाठीही ही निदर्शने करण्यात येत आहेत. - सावियो रॉड्रिग्स, गटाध्यक्ष, दक्षिण गोवा काँग्रेस समिती

जागृत राहणे गरजेचे : केंद्र सरकारने देशातील सर्व मोठे मोठे प्रकल्प, परियोजना अंदानी कंपनीला दिले आहेत.

त्यात कसलीही पारदर्शकता नसल्याचे मोरिनो रेबेलो यांनी सांगितले. देशातील सर्व नागरिकांनी अदानी समुह व केंद्र सरकारबद्दल जागृत राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com