Adani Group: गोव्यात अदानींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अदानी समूहाविरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने सोमवारी एलआयसीच्या कार्यालयामोर सकाळी निदर्शने करण्यात आली आणि गौतम अदानींच्या पुतळ्याचे दहन केले.
Goa Peoples protest |Adani Group
Goa Peoples protest |Adani Group

Adani Group: भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बँकेकडून हजारो कोटींची कर्जे घेणाऱ्या अदानी समूहाला केंद्रातील भाजप सरकार वाचवत आहे. त्याविरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने सोमवारी एलआयसीच्या कार्यालयामोर सकाळी निदर्शने करण्यात आली आणि गौतम अदानींच्या पुतळ्याचे दहन केले.

काँग्रेसतर्फे निदर्शने होणार म्हणून एलआयसीच्या कार्यालयासमोर सकाळी पोलिस उपस्थित होते. काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे वाटत होते. परंतु तीस ते चाळीस जण आंदोलनात सहभागी झाले होते. अनेकांची आंदोलनाच्यावेळी छायाचित्रात येण्यासाठीची धडपड यावेळी दिसून आली.

Goa Peoples protest |Adani Group
Mapusa Municipality: दुकान परवान्‍यांचे नूतनीकरण रखडले; म्हापसा पालिकेला करोडोंचे नुकसान

यावेळी सुनील कवठणकर म्हणाले की, अदानी समूह नऊ वर्षांत एवढ्या गतीने जगातील तिसऱ्या क्रमांकावरचा श्रीमंत होतो. एलआयसीसारख्या कंपन्या अशा लोकांना कर्ज देतात आणि हे पैसे बुडाले तर राज्याची अर्थव्यवस्था बिघडणार आहे.

अदानी समूहाचा मोठा घोटाळा आहे. गरीब लोकांनी पैसा जमा करून एलआयसी जमा केली आहे. तो पैसा भाजपने अदानी समूहाला द्यायला लावला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांच्या मागे भाजप सरकार कायम आहे. लोकसभेत या विषयावर चर्चा करण्याचे भाजप नाकारत आहे.- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Goa Peoples protest |Adani Group
Goa Peoples protest |Adani Group Dainik Gomantak

एलआयसीने अदानी समूहाला दिलेली कर्जाची रक्कम ही विम्याचे हप्ते भरणाऱ्यांची आहे. त्यात कष्टकऱ्यांचाही पैसा आहे. हिडनबर्ग अहवाल बाहेर आल्याने अदानींचा भ्रष्टाचार समोर आला आहे.

अदानी समूहाला दिलेल्या कर्जप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी, त्याचबरोबर लोकसभेत एलआयसी आणि एसबीआयला जबरदस्तीने अदानी समूहाला कर्ज देण्यास भाग पाडले, यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे -अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com