Goa Culture Awards: राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण लवकरच...

कला-संस्कृती’च्या पुरस्कारांचे दर्या संगम-कला अकादमी येथे आयोजन : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची खास उपस्थिती
Culture Award
Culture AwardDainik Gomantak

Goa Culture Awards: कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, 8 रोजी सायंकाळी 4.30 वाजता दर्या संगम, कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रख्यात चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती असेल.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यासोबतच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सचिव मिनिनो डिसोझा आणि कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप उपस्थित असतील.

Culture Award
Goa News: पाटो परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण

यंदाचा उत्कृष्ट सांस्कृतिक संस्थेचा पुरस्कार श्री पांडुरंग प्रासादिक नाट्य मंडळ साखळी यांना प्राप्त झाला आहे तसेच उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार लोकमान्य ग्रामीण वाचनालय, ओपा-खांडेपार तर उत्कृष्ट ग्रंथपालाचा पुरस्कार अंजली भिडे, ग्रंथपाल, एस.एस.धेंपो महाविद्यालय वाणिज्य आणि अर्थशास्त्र कुजिरा यांना प्राप्त झाला आहेत.

गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार

यंदाचा गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार अश्‍विनी जांबावलीकर, सूर्या शेट्ये, लिंडा ब्रागांझा, जुझे आंतोनियो आगोस्तीन फर्नांडिस उर्फ ॲंथनी सॅन, पेद्रू बार्बोजा, तुळशीदास कवळेकर, गोपाळ राऊळ, देविदास कदम, वेंकटेश कामत शंखवाळकर, सुरेश मयेकर, अनिता कुंडईकर, मॉरिशियो फर्नांडिस यांना प्राप्त झाला आहे.

Culture Award
Goa News: पैंगीणच्या ग्रामसभेत डिपीआर रद्द करण्यासंबंधीचा ठराव मंजूर

युवा सृजन पुरस्कार

यतीन सिनाय तळावलीकर यांना संगीत, आरती गावडे यांना नाट्य, मीना गोयस यांना तियात्र, महेश सतरकर यांना लोककला, वासुदेव शेट्ये यांना ललितकला तर गणेश शेटकर सर्जनशील छायाचित्र या क्षेत्रातील कार्याबद्दल युवा सृजन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com