माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

Manik elephant Goa: माणिक हत्तीवर गोव्यात उपचार शक्य नसल्याने त्याला वनतारामध्ये दाखल करण्याची गरज जंगल बुक रिसॉर्टने व्यक्त केली होती.
Goa High Court elephant order
Manik elephant Goa
Published on
Updated on

पणजी: गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ५९ वर्षीय हत्तीला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला केली आहे. ५९ वर्षीय माणिक हत्ती संधिवाताच्या आजाराने त्रस्त आहे. सध्या त्याला कुळे येथील जंगल बुक रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

माणिक हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परवानगी दिली आहे. पण, यासाठी पशुवैद्यकीय खात्याची परवानगी आवश्यक असणार आहे.

ही परवानगी मिळाल्यानंतर माणिकला वनतारामध्ये हलवता येणार आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता माणिकला उपचारासाठी लवकरात लवकर वनतारामध्ये हलवता येईल, अशापद्धतीने प्रयत्न करण्याची सूचना हायकोर्टाने दिली आहे.

Goa High Court elephant order
Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

सारंग कोटवाल आणि आशिष चव्हाण यांनी याबाबत निर्णय दिला आहे. माणिकवर उपचार झाल्यानंतर त्याला पुन्हा गोव्यात आणण्याबाबत बोलताना न्यायाधीशांना हा मुद्दा आता महत्वाचा नसल्याचे स्पष्ट केले.

माणिकला योग्य उपचार मिळावे यासाठी त्याला वनतारामध्ये दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी वन खात्याला सूचना करावी यासाठी जंगल बुक रिसॉर्टने हायकोर्टात धाव घेतली होती.

Goa High Court elephant order
Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

गोव्यात माणिकवर उपचार शक्य नसल्याने त्याला वनतारामध्ये दाखल करण्याची गरज जंगल बुक रिसॉर्टने व्यक्त केली होती. रिसॉर्टच्या वतीने विवेक रॉड्रिग्ज आणि लाबन कार्व्हालो यांनी बाजू मांडली. माणिकची २००९ पासून रिसॉर्ट काळजी घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com