Sattari Dam Project : चरावणे धरण तातडीने मार्गी लावा; सत्तरीवासीयांची मागणी

वन्यजीव मंडळाने मान्यता दिल्याने आशा पल्लवित
Sattari Dam Project
Sattari Dam ProjectDainik Gomantak

Sattari Dam Project : सत्तरी तालुक्यात डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे गावातील लहानशा नदीवर 2006 साली महत्वाकांक्षी धरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यावेळी तो एका ‘एनजीओ’ने विरोध केल्याने रद्द झाला होता.सदर धरण 35 मीटर उंचीचे व 230 हेक्टर मीटर क्षेत्र साठवण क्षमता असे नियोजन करण्यात आले होते.तेव्हा काही प्रमाणात कामही झाले होते.

आता या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने शीघ्र गतीने धरणाचे काम मार्गी लावावे,अशी मागणी चरावणे व परिसरातील लोकांनी केली आहे.

यासंदर्भात ‘गोमन्तक’च्या वाळपई प्रतिनिधीने चरावणे गावात भेट देऊन स्थानिकांचे मत जाणून घेतले. गोवा सरकारच्या वन्यजीव महामंडळाने या धरण प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चरावणे धरण प्रकल्प होईल, अशी आशा बाळगून लोक आहेत.

Sattari Dam Project
Goa Congress : उत्तर गोव्यातील खड्डेमय रस्त्यांबाबत काँग्रेस कार्यकर्ते छेडणार आंदोलन

प्रकल्प लाभदायी ठरेल

एकूण 6901.68 हेक्टर क्षेत्र पंचायत भागात आहे. यापैकी सुर्ला गाव चोर्ला घाटात असल्याने तो सोडल्यास अन्य पंचायत क्षेत्रातील गावातील लोकांना धरणाचा लाभ होऊ शकतो. अंदाजे अडीच ते तीन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असा अंदाज लोकांनी व्यक्त केला आहे.

सरकारने पुन्हा एकदा चरावणे धरणासाठी पुढाकार घेतल्याने सरकारचे व स्थानिक आमदाराचे अभिनंदन करावे लागेल. हे धरण भविष्यात लोकांना वरदान ठरणारे आहे.

Sattari Dam Project
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर जैसे थे; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

पाणी जीवनाचा आवश्यक घटक आहे. चरावणे व जवळच्या गावात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत असते. प्रत्येकवेळी लोकांना टँकरवर अवलंबून रहावे लागते. ती समस्या कायमची सुटण्यासाठी धरण प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे.

दीपक गावस, ग्रामस्थ

प्रस्तावित चरावणे धरणामुळे डोंगुर्ली ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील सात गावांना पिण्याच्या पाण्याची सोय, शेती बागायतीसाठी सोय होणार आहे. त्यामुळे गोवा मुक्तीनंतरचा अतिमहत्वाकांक्षी असा धरण प्रकल्प हाती घेतल्यास पंचायत क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यास वाव मिळणार आहे. चरावणेत एप्रिल, मे महिन्यात पाण्याची मोठी समस्या असते. म्हणूनच तातडीने हालचाली करून धरण प्रकल्प मार्गी लावावा.

अभिषेक गावस, चरावणे

चरावणे या प्रस्तावित धरणामुळे डोंगुर्ली, ठाणे, चरावणे, गोळावली, हिवरे, रिवे अशा गावांना लाभ होणार आहे. म्हणूनच सरकारने धरण कामासाठी पुढाकार घेऊन लोकांची मागणी पूर्ण करावी. जेणेकरुन पिण्यासाठी पाणी, सिंचनाची सोय होणार आहे. हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे. सरकारने पुढील सोपस्कार तातडीने केले पाहिजेत.

संतोष गावस, चरावणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com